आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीतून 70 हजार क्युसेकने पाणी सोडले; भीमाकाठच्‍या गावांना सावधानतेचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभुर्णी - उजनी पाणलोट क्षेत्रात नीरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी धरणातून १५ दरवाजातून ७० हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. तर नीरा नदी पात्रातून ४० हजार क्युसेकने पाणी येत आहे. असे एकूण एक लाख १० हजार क्युसेक विसर्ग संगम येथे मिसळत आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 
 
गेल्या तीन दिवसांपासून उजनीच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे गुरुवारी सायंकाळी दहा वाजता १५ दरवाजांमधून ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यात शुक्रवारी सकाळी पुन्हा वाढ करून ७० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर नीरा खोऱ्यातही दमदार पाऊस पडत असल्यामुळे नीरा नदी पात्रातून ४० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग संगम येथे भीमा नदीत मिसळत आहे. दोन्ही मिळून एक लाख १० हजारांचा विसर्ग पंढरपूरकडे येत आहे. उजनी धरणातील विसर्ग नीरा नदीतील विसर्ग अशा दोन्ही विसर्गाचा संगम नीरा नरसिंहपूर येथे भीमा नदीत होत असल्याने संगमपासून पुढे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांसह माढा पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता बंडगार्डन येथून हजार २८० तर दौंड येथून एकूण ३० हजार ३४७ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने आणखी पाऊस झाल्यास उजनीतून पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या उजनीत १०८. ५३ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. 
 
पुणे,नीरा खोऱ्यातील धरणातून पाणी सोडले : पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील पाच धरणांतून केवळ हजार ९०३ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर नीरा खोऱ्यातील वीर धरणातून १४ हजार ४११, भाटघर येथून हजार ६६७ गुंजवणे येथून ३०८ असा एकूण १६ हजार ८६ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. मात्र उजनी पाणलोट क्षेत्रात नीरा नदी खोऱ्यातील पात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे नीरा भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...