आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Level Decreasing Give Residents Some Relife

पाणी कमी झाल्याने रहिवाशांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सम्राटचौक परिसरातील महेश नगर सोसायटीत ड्रेनेजचे पाणी शिरल्याची बातमी दिव्य मराठीने रविवारी प्रसिध्द केली. त्याची दखल घेत महापालिकेने युध्दपातळीवर काम सुरू केल्याने सोसायटीत साचलेल्या घाण पाण्याचा निचरा झाला. दरम्यान, रविवारी दुपारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोसायटीला भेट देऊन पाहणी केली. तसेच, येथील ड्रेनेज लाइन तत्काळ बदलण्याची सूचना महापालिकेस केली.

महेश नगर सोसायटीत लोकसंख्या अधिक आणि ड्रेनेज लाईन लहान यामुळे ड्रेनेज तुंबुन साेसायटीत घाण पाणी शिरले. रविवारी समस्येचे गांभीर्य ओळखून ड्रेनेज लाइन स्वच्छ करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली. या भागातील सात चेंबर स्वच्छ करण्याचे काम यद्धपातळीवर सुरू करण्यात आले. काही चेंबरमध्ये मोठमोठे दगड आढळून आले. दगड काढल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. समस्या तात्पुरती मिटली असलातरी संपूर्ण लाइन बदलणे हाच पर्याय आहे. पालकमंत्री देशमुख यांनी सोसायटीला भेट देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे, एस.ए. आलमेलकर, माशाळे, एस.डी. कारंजे, गुड्डू शर्मा, श्रीनिवास भुतडा, संजय मर्दा आदी उपस्थित होते.

चेंबर स्वच्छतेचे काम सुरू
ड्रेनेजलाइन स्वच्छ करण्याचे काम मार्गी लागत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. सोसायटीमधील पाणी कमी झाले आहे. निधीचे नियोजन करून ड्रेनेजची नवीन लाइन टाकून घेऊ. गंगाधरदुलंगे, सार्वजनिक आरेाग्य अभियंता