आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीचा जलसाठा अधिक स्थितीत, मात्र शेतीच्या पाण्याची चिंता कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अखेर उजनी धरणातील जलसाठा सोमवारी अधिक स्थितीत आला. त्यामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी शेतीसाठी पाणीचिंता कायम आहे. शहराला पिण्यासाठी पाइपलाइनद्वारेच पाणी घ्यावे लागेल, तरच येत्या उन्हाळ्यापर्यंतचा जलसाठा उपलब्ध राहील असे चित्र आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून वजा स्थितीत असलेले उजनी धरण सोमवारी रात्री अधिक स्थितीत आल्याने जुलै २०१६ पर्यंत धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा करणे शक्य आहे. धरणातून कॅनाॅलद्वारे शेतीला पाणी सोडण्यासाठी धरणामध्ये ३३ टक्के पाणी असणे अपेक्षित असल्याने शेती संकटातच आहे.

सोमवारी रात्री धरणामध्ये ४९१.०९२ मीटर म्हणजेच टक्के पाणी आले असले तरी पुणे धरणातून येणाऱ्या विसर्गात मोठी घट झाली होती. गेल्या तीन दिवसांत पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांत धरणांत साडेतीन टीएमसी पाणी आले आहे. मागील दाेन दिवसांत पुणे परिसरातील पाऊस कमी झाल्याने सोमवारी विसर्ग घटून हजारावर आल्याचे लाभक्षेत्र प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

१५ ऑक्टोबरला नियोजन
सोलापूरशहर जिल्ह्याला उजनीचे पाणी पुरणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत १० टक्के वाढ झाली. शासनस्तरावर धरणातील पाण्याचे नियोजन १५ ऑक्टोबरनंतर होणार आहे. शिवाय ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी असेल तरच ते शेतीला सोडता येणार आहे. एनटीपीसीची जलवाहिनी पूर्ण झाल्यास आणि नदीतून पाणी सोडणे बंद झाल्यास तेच पाणी कॅनाॅलद्वारे शेतीला सोडता येणे शक्य होणार आहे. यामुळे एनटीपीसी जलवाहिनी किती दिवसांत पूर्ण होईल, यावरच शेतीला पाणी देण्याचा निर्णय अवलंबून राहणार आहे.

३६ वर्षांतील निचांकी पातळी...
१९८०ते २०१४ दरम्यान उजनी धरणात सर्वात कमी ४४ टक्के पाणीसाठा होता. मात्र यंदा टक्का पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे शासन निर्णयानुसार धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील धरणातून येणाऱ्या विसर्गावर धरणाची पाणीपातळी अवलंबून राहणार आहे.