आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन चुकले, पुण्याच्या धरणांमधून उजनीत पाणी सोडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - औज बंधारा येथे शहरास २० दिवस पुरेल इतका पाणी साठा आहे. त्यामुळे उजनी धरणातून तत्काळ पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापालिका पाणीपुरवठा विभागाने उजनी लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्याकडे बुधवारी केली. औज धरणात २.७ मीटर इतका पाणीसाठा असून, ते पाणी शहरासाठी २० दिवस पुरेल. यापूर्वी सोडलेले पाणी २५ जुलै रोजी औज बंधाऱ्यात पोहोचले. मध्यंतरी चिंचपूर बंधारा येथून पाण्याची गळती झाली. आगामी काळात पाऊस आल्यास शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने तसे पत्र दिल्याचे महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी सांगितले आहे.

२००७ते २०१४ या कालावधीत यंदापेक्षा कमी जलसाठा असतानाही भीमा-सीना बोगद्यात सीना-माढा कालव्यात पाणी सोडण्यात आले. त्यावेळी पाण्याचे योग्य नियोजन झाले होते. परंतु यंदा त्याचे योग्य नियोजन झाले नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनी धरणात पिण्यासाठी जनावरांसाठी पाणी सोडण्याची माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी मागणी केली. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माढा तालुका राष्ट्रवादी काँग्र्रेसच्या वतीने येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

आमदार शिंदे म्हणाले, शेळीपालन, दुग्धोत्पादन आदी जोड धंद्यांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत. फक्त माढा तालुक्यातून दररोज दोन लाख ४० हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. यामुळे चारा छावणी सुरू करून पिण्यासाठी जनावंरासाठी पाणी सोडल्यास शेतकरी देशोधडीला लागेल, असे ते म्हणाले.

{सोलापूर जिल्हादुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा
{डावा,उजवा,सीना नदी सीना माढा उपसा सिंचन योजनेत पाणी सोडा
{जनावरांसाठीचाराछावण्या, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करा
{रोजगारहमीयोजनेची कामे सुरू करा, त्यातून विहिरींना मंजुरी द्या {एफआरपीनुसारऊसबिलदेण्यासाठी निधीची तरतूद करा
{शेतकऱ्यांचेकर्जमाफ करावे, पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे
{पाण्याअभावीजळालेल्यापिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या
{सीना-माढायोजनेच्याउर्वरित कामांसाठी निधी द्या, रद्द ३५ कोटींचे टेंडर काढा
{संतएकनाथमहाराज पालखीमार्गाच्या मुंगशी ते पंढरपूर कामासाठी िनधीची तरतूद करा {राष्ट्रीयअन्नसुरक्षायोजनेतील बंद केलेला धान्यपुरवठा सुरू करा
{भीमा-सीनानदीवरबॅरेजेस बांधण्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी {जळालेलेट्रान्स्फाॅर्मरबदलावेत, शेतकऱ्यांचे वीजिबल माफ करावे
{दुधालाप्रतिलिटर२५ रूपये दर द्यावा
{धनगरसमाजालाआरक्षण मिळावे.