आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिवळे पाणी : भीमेच्या पाण्यातील प्रदूषणाचा तपास गुलदस्त्यातच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर जिल्ह्याला भीमा नदीच्या पात्रातून मिळणारे पाणी पिवळे येत असल्याच्या तक्रारीनंतर गेल्या महिन्याभरापासून प्रशासन चौकशीचा फार्सच करत अाहे. या पाण्यात कोणते घटक मिसळले अाहेत, कोठून मिसळले अाहेत यबाबत अद्याप तपास झाला नाही. एकूणच संशयास्पद अाणि संदिग्ध वातावरण निर्माण झाले अाहे. तरी प्रशासनाने तातडीने या प्रकरणातील माहिती द्यावी, असे पत्र अामदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना दिले अाहे.

यापूर्वी असेच एक पत्र सहा जानेवारी रोजी दिले होते. त्यानंतर अाज तेच पत्र स्मरणपत्र म्हणून दिले अाहे. अद्यापपर्यंत तपास होऊन माहिती उपलब्ध झालेली नाही. शहर जिल्ह्यात होत असलेल्या दूषित पाण्याबाबत चार जानेवारी रोजी सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती. त्यानंतर अाज दहा दिवस उलटले तरी तपासाची माहिती समोर अालेली नाही. यासाठी हे स्मरणपत्र द्यावे लागत असल्याचे अामदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

महाराष्ट्र राज्य अारोग्य प्रयोग शाळेच्या वतीने घेण्यात अालेल्या दूषित पाण्याचे नमुने जानेवारी रोजी घेण्यात अाले. त्याचा तपासणी अहवाल, प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर झालेला पत्रव्यवहार, भीमा नदीतील पाणी दूषित केल्याबाबत एका कारखान्यावर भारतीय दंड विधान कलम क्र. १३३ अन्वये केलेली कारवाई, त्याची एफअायअार काॅपी, दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी होत असलेली उपाययोजना या प्रकरणाबाबतच्या बैठकांमधील इतिवृत्तांत मिळावा, अशी मागणी अामदार शिंदे यांनी केली अाहे.

हे प्रश्न अजून अनुत्तरीतच
नदीच्या पात्रातील पाण्यात कोणते केमिकल मिसळले?
औज बंधारा येथील मासे कशामुळे मृत्युमुखी पडले?
पिवळ्या पाण्याचा मानवी अारोग्यावर काय परिणाम होतो?
पीएसीतील घटक मानवी अारोग्याला घातक अाहेत का?
पिवळ्या पाण्याच्या तीन-चार विविध तपासण्या करण्यात आल्या, पण त्याच्या अहवालाचे पुढे काय झाले?