आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उजनीच्या पाण्याची तूर्त नाही गरज, पुढील काळात करता येईल वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सलग चार दिवसांपासून औज बंधारा परिसरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढून मीटरपर्यंत गेली आहे. त्याने पुढील दोन महिन्यांचा सोलापूरचा पाणीप्रश्न मिटला आहे. आता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची आवश्यकता तूर्त नसल्याने पालिकेचे १२ लाख रुपयांची बचत होणार आहे. शिवाय भविष्यातही उजनीतील वाचलेल्या पाण्याची शहराला मदत होईल.

पावसाळ्यातील पहिले तीन महिने कोरडे गेल्याने औज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी मागील आठवड्यात खूपच कमी झाली होती. परिणामी उजनीतून नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी जोर धरत होती. आता महापालिकेने उजनी धरणातून पाणी सोडण्याचा आग्रह सोडला आहे.

तीन ठिकाणची गळती दुरुस्तीविनाच
औजते सोरेगाव दरम्यानच्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती होती. दुरुस्तीचे काम बुधवार हाती घेण्यात आले. त्यात पावसाने व्यत्यय आणल्याने काम अर्धवट थांबवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी टाकळी पंप हाउस येथील चार पंप सुरू करण्यात आले.
जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी :महापौर आबुटे यांना भवानी पेठ येथे दरवाजे, खिडक्या तुटलेले दिसले. सेवकांची कमतरता होती. पाकणी जलशुद्धीकरण केंद्र असुरक्षित असून, सुरक्षा भिंत नाही. तेथे तुरटी अस्ताव्यस्त पडलेली दिसली. ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रजिस्टर दिसून आले नाही. त्यामुळे रजिस्टर ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

औज साठा अहवाल शासनाकडे पाठवणार
^कुरनूर धरणात पाणी नसल्याने अक्कलकोट तर औजमध्ये पाणी नसल्याने सोलापूरवर जलसंकट आले होते. सोलापूरसाठी १४ सप्टेंबर रोजी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र मागील चार दिवसांत झालेल्या पावसामुळे औज बंधाऱ्यात मीटर तर कुरनूर धरणात फुटांपेक्षा अधिक पाणी आले आहे. उजनी धरणातून पाणी सोडणे वा सोडणे याबाबतचा निर्णय शासनस्तरावर होईल. मात्र, याबाबतचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी
^औज बंधाऱ्यात पुरेसे पाणी आले आहे. त्यामुळे तूर्तास शहरासाठी पाण्याची आवश्यकता नाही. दोन मीटर पातळी असेपर्यंत महापालिका पाण्याची मागणी करणार नाही. गंगाधरदुलंगे, मनपा प्रभारी