आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औजमधील पाणी संपले, आता डोहातून उपसा सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातील पाणीसाठा सोमवारी दुपारी संपला. बंधारा परिसरातील डोहातील पाणी जेसीबी आणि पोकलेनने ओढून आणून शहर पाणीपुरवठा यापुढील काळात सुरू ठेवावा लागणार आहे. याचा फटका शहर पाणीपुरवठ्याला बसणार असून पुढील आठवडा शहरात पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. औज बंधारा सोमवारी दुपारी शून्य टक्क्यावर आला. टाकळी येथील जॅकवेलला २.५ फूट पाणी आहे. ही पातळी टिकवून ठेवली तर तीन पंप चालू शकतात. त्यासाठी महापालिकेने सोमवारी दुपारनंतर दोन जेसीबीच्या सहाय्याने पाणी जॅकवेलपर्यंत ओढून आणण्याचे काम सुरू केले आहे. जेसीबीने कामाची गती मंद होत असल्याने पोकलेनने काम करण्यात येत आहे.

पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्तुता काही भागात पाच दिवसाआड त्यापेक्षा अधिक दिवसांनी पाणी मिळते. शिवाय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

दाेन दिवसांनंतर तीव्रता जाणवणार
डोहातील पाणी पंप हाउसपर्यंत आणण्यात येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तीन पंप सुरू राहतील. त्यानंतर तेही पाणी संपणार आहे. या आठवड्यात शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. औज बंधाऱ्यात उजनीचे पाणी पोहोचण्यास पाच दिवस लागतील. काही काळ शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

भीमेतील पाण्याने पुळूज ओलांडले
शहरपाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडलेले पाणी रविवारी सकाळी पुळूज बंधारा येथे पोहोचले. सोमवारी सकाळी पुळूज बंधारा भरून पाणी पुढे आले. आैज बंधाऱ्यात पाणी येण्यासाठी अजून तीन बंधारे आणि ७५ किमी अंतर आहे. हे पाणी औज बंधाऱ्यात येण्यासाठी पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. आठ दिवसांत १३५ किमी अंतर पाणी आले आहे.

औजमधील पाण्याची पातळी झाली कमी
^औज बंधाऱ्यात पाणी नाही. पाण्याची पातळी कमी असल्याने या आठवड्यात शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल. बंधाऱ्यातील पाणी पंप हाऊसपर्यंत आणण्यात येत आहे. सोमवारी दिवसभर काम सुरू होते.'' गंगाधर दुलंगे, प्र. सार्वजनिकआरोग्य अभियंता, मनपा