आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापुढे चार दिवसांआड मिळणार शहराला पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बुधवारी महापौर कक्षात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेण्यात आली. यापुढील काळात चार दिवसांआड पाणीपुरवठा करणे, प्रत्येक वॉर्डात दोन बोअर मारून त्यावर सोलर पंप बसवणे, प्रसंगी टॅँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींवरील फिल्टर यंत्रणा कार्यान्वित करणे, दिलीप कोल्हे यांच्या विहिरीतून पाणी घेणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय या एकमताने घेतले.
यावेळी महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, पक्षनेते संजय हेमगड्डी, स्थायी सभापती नाना काळे, दिलीप कोल्हे, कृष्णाहरी दुस्सा, पांडुरंग दिड्डी, अॅड. यू. एन. बेरिया, आरिफ शेख, आनंद चंदनशिवे, अनिल पल्ली, माशप्पा विटे, विनायक कोंड्याल आदींसह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. साडेअकराची बैठक साडेबारा वाजता सुरू झाली. प्रारंभी प्रशासनाकडून सध्यस्थिती आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे राहील याची माहिती घेण्यात आली.

भिस्त एनटीपीसीच्या पाइपलाइनवर
सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे म्हणाले, सध्या सहा हजार क्युसेक गतीने पाणी सोडले आहे. औजमध्ये दोन दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. धरणातून औज बंधाऱ्यात सोडलेले पाणी हे शेवटचे असेल. उजनीची पातळीसुद्धा खालावल्यामुळे इथून पुढे तेही पाणी साेडणार नाहीत. येणारे पाणी चार दिवसांआड दिल्यास साठ दिवस पुरेल. त्यासाठी आहे त्या पाण्यात नियाेजन करून एनटीपीसीच्या पाइपलाइनचे काम लवकर कसे होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.'
सध्या रोज १३५ दशलक्षलिटर (एमएलडी) पाण्याचा उपसा करून ८५ एमएलडी पाण्याचे पिण्यासाठी वाटप केले जाते. चार दिवसांचे एकूण ३४० दशलक्ष लिटर पाणी झाले. सोलापूरसाठी तुम्हाला चार दिवसांत लागते २१० ते २२० दशलक्ष लिटर पाणी. मग उर्वरित पाणी जाते कुठे, असा प्रश्न बेरिया यांनी विचारला. बैठकीच्या शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला.

साधू वासवानी येथूनदररोज ५४ टॅँकर पाणी देण्यात येते. महापालिकेद्वारे पाणीपुरवठा करणारे टॅँकर २५ आहेत. तेवढ्यांच टंॅकरना पाणी घेऊ द्यावे, खासगी टॅँकरवाल्यांना पाणी देऊ नये. चावीवाल्यांना कामचुकारपणा करू देऊ नये, अशी मागणी अानंद चंदनशिवे यांनी केली.

बैठकीत आयुक्तांना देण्यात आल्या या जबाबदाऱ्या
Áएनटीपीसी पाइपलाइनबाबतजिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची गुरुवारी भेट घेणे.
Áविहिरीवरीलफिल्टरयंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात यावे.
Áसर्वचावीवाल्यांवरनियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेतर्फे एक अधिकारी नेमणे.
Áरेल्वेविभागानेनाल्यावर उभारलेल्या फिल्टर प्लान्टबाबत चौकशी करणे.
Áबोअरवरपूर्वीबसवण्यात आलेले सौर ऊर्जा पंप दुरुस्त करून घेणे.
Áविहिरीवरफिल्टरयंत्रणा बसवून कार्यान्वित केल्यामुळे पोलिसात तक्रार करणे.
Áदोषींना निलंबितकरणे.

अर्ध्या तासाची चर्चा झाली निष्फळ
शहरातील१३ विहिरींवर फिल्टर यंत्रणा बसवून ती राबवायची, असे ठरले होते. त्यातील पाच विहिरींवर यंत्रणा बसवली. मक्तेदाराला ८९ लाख दिले. बसवलेली यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे मक्तेदाराला बोलावून घ्या, त्याच्याकडून उर्वरित काम करून घ्या आदी चर्चा सुरू होती. अर्धा तास चर्चा झाल्यानंतर त्या मक्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकल्याचे पुढे आले. दुसरे टेंडरही काढण्यात अाले. पण त्यात एकही निविदा आली नाही, असे प्रशासनाने सांगितले. दुसरी निविदा निघाल्याने पूर्वीची आपोआप आपोआप बाद होते, हे लक्षात आल्याने चर्चा थांबली.

आयुक्तांची तत्परता
एनटीपीसीच्या जलवाहिनीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी गुरुवारी भेटून सविस्तर चर्चा करण्याचा निर्णय बुधवारी झाला. गुरुवारची वाट पाहता बुधवारी रात्रीच जिल्हाधिकारी यांच्या घरी जाऊन चर्चा केली. या प्रकरणी पुढील आठवड्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आयुक्तांनी दिली.