आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी टंचाई पाहता आताच सहा महिन्यांचे नियोजन करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - उजनीधरणातून पाणी सोडल्यास, ‘एनटीपीसी’च्या जलवाहिनीतून पाणी मिळाल्यास शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. भविष्यकाळातील सहा महिन्यांचे नियोजन आताच करा. पर्यायी व्यवस्था आतापासून सुरू करा, अशा सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या.
भविष्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सोमवारी महापालिकेची बैठक घेतली. तीत महापालिका आयुक्त, अधिकारी, पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. चर्चेनंतर आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी प्रशासनाकडून घेण्यात येत असलेल्या खबरदारीची माहिती दिली. शहरात सध्या चार िदवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

यावेळी महापौर प्रा.सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, स्थायी समितीचे सभापती पद्माकर काळे, महिला बालकल्याण समिती सभापती अश्विनी जाधव, माजी महापौर अलका राठोड, आरिफ शेख, अॅड. यू. एन. बेरिया यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.

महापालिका पाणीटंचाई बैठकीत बोलताना आमदार प्रणिती शिंदे. त्यावेळी महापौर सुशीला आबुटे, प्रवीण डोंगरे, पद्माकर काळे, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील आदी.

आताच नियोजन गरजेचे
^सध्याची स्थिती पाहता भविष्यकाळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यावेळी धावपळ करण्यापेक्षा आताच नियोजन करणे योग्य ठरेल. त्यावर आयुक्तांशी चर्चा केली. अन्य स्रोत उपलब्ध करावेत, त्यासाठी पदाधिकारी निधी वापरावा असे सुचवले आहे. तसेच शासन पातळीवर उजनी धरणातील पाणी भीमा नदीतून घ्यावे आदी प्रयत्न आहेत.” प्रणिती शिंदे , आमदार

पदाधिकारी निधी
शहरातपाणी टंचाई काळात पदाधिकारी निधी वापरण्याची सूचना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. या निधीबाबत नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी यांनी तक्रार केल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यावर विधान सल्लागार यांचा अभिप्राय असल्याचे हेमगड्डी यांनी सांगितले.

विहिरीची अट शिथिल करा
शहरात१३ विहिरींवर पंप बसवण्याकरता महापालिकेने अटी घातल्या आहेत. त्यामुळे त्याचे काम रखडले आहे. या जाचक अटी रद्द कराव्यात, असे शिंदे यांनी सांगितले. प्रभागवार पाण्याचे नियोजन करण्यास उपअभियंता सिद्राम उस्तरगी चौबे यांची नियुक्ती केल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी सांगितले.

सर्व भागांत समान पाणीपुरवठा करा
शहरात समान पाणीपुरवठा करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. काही ठिकाणी दोन तास तर काही ठिकाणी चार तास पाणीपुरवठा होत असल्याचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी सांगितले.

मुद्यांवर चर्चा
{१३विहिरी ताब्यात घेऊन पाणीपुरवठा
{बोअरवर सौर ऊर्जेचे संच बसवणे
{गरजेप्रमाणे आवश्यक भागात बोअर घेणे
{बोअर दुरुस्ती मोहीम सुरू करणे
{सर्व चावीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे
{जलवाहिनीची गळती बंद करणे
{पाणीपुरवठ्यावर सहाय्यक आयुक्त नेमावे
{मार्च ते जूनसाठी टँकरचे नियोजन
{प्रभागवार पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन

शहरात पाहणी सुरू
^भविष्यकाळ लक्षात घेत पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण सुरू आहे. उजनी धरणातून पाणी सोडण्याकरता राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. पाणी चोरी रोखण्याकरता चिंचपूर बंधारा येथे पोलिस बंदोबस्त आहे. ‘एनटीपीसी’ जलवाहिनीने पाणी मिळाले तर टंचाई जाणवणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी बैठक घेणार आहेत.” विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त, महानगरपालिका

... तेही बंद होईल
शहरात आतापर्यंत इतकी पाणीटंचाई कधी निर्माण झाली नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता दुलंगे यांनी बैठकीत दिली. भविष्यात उजनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास दुबार उपसा करूनही ५० एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी मिळेल. तेही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.