आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औज बंधाऱ्यात पाच दिवस पुरेल इतकेच पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी आणि औज बंधारा स्रोतांतील औज बंधाऱ्यात पाण्याचा साठा केवळ ०.३ मीटर इतकाच आहे. हा पाणीसाठा काटकसरीने वापरला तर तो ११ एप्रिलपर्यंतच पुरेल. उजनीचे पाणी भीमा नदीच्या पात्रात १० एप्रिल रोजी सोडले तरी पाणी पोहोचायला १७ एप्रिल उजाडेल. म्हणजेच पुढील आठवड्यात शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. उजनीतूनपाणी सोडण्यात येणार आहे, पण कधी सोडणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. शासन पातळीवर निर्णय होऊनही प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. त्याचा फटका विनाकारण शहरवासीयांना बसत आहे. पाणी असून नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
साडेचार कोटी भरले
उजनीतूनशहरासाठी पाणी सोडावे यासाठी यापूर्वी महापालिकेने दीड कोटी रुपये भरले. गुरुवारी तीन कोटी भरले. पाच कोटी मागणी असताना मनपाने साडेचार कोटी रक्कम अडचणीच्या काळात भरली तरी पाणी सोडले नाही.

आजउजनी जलवाहिनी दुरुस्ती
उजनीते सोलापूर भीमा जलवाहिनीला सुमारे १२ ठिकाणी गळती असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी हाती घेण्यात येणार आहे. १२ तासांत काम पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात १६ ते १८ तास लागणार अाहे. त्यामुळे रविवार आणि सोमवार शहरात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

आज निर्णय अपेक्षित
^उजनीतूनशहरासाठीपाणी सोडण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. शनिवारी निर्णय अपेक्षित आहे. शिवाजी चौगुले, अधीक्षक अभियंता, उजनी लाभक्षेत्र

११ एप्रिलपर्यंत पाणी पुरेल
^औज बंधाऱ्यात०.३ मीटर इतके पाणी असून, ११ एप्रिलपर्यंत पाणी पुरेल. नदीपात्रात चर घेऊन पाणी घेतले तरी १२ एप्रिलपर्यंत पाणी पुरेल. त्यानंतर टाकळी पंप हाउस बंद पडेल. पाण्यासाठी महापालिका शासनाकडे ४.५ कोटी रुपये भरले. संजय धनशेट्टी, उपअभियंता,मनपा

पुढील आठवड्यात पाणीटंचाई
औजमधील पाणी मंगळवारपर्यंत पुरणार आहे. उजनीतील पाणी मंगळवारपर्यंत पोहोचणार नाही. त्यानंतर शहरात पाणीटंचाई सुरू होणार आहे. उजनी एकच स्रोत शहरासाठी राहणार अाहे. त्यामुळे सहा ते सात दिवसांआड पाणी पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.