आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"स्थायी\'कडून पन्नास टक्के पाणीपट्टी कपातीची शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकास्थायी समितीच्या बैठकीत ५० टक्के पाणी कपातीची शिफारस करीत ४६६ कोटींची भरीव अशी उत्पन्नात वाढ दाखवून १२९५.४५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शनिवारी बहुमताने मंजूर करण्यात अाले. स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ८२५ कोटींच्या प्रशासकीय अंदाजपत्रकावर चर्चा झाली. पाणीपट्टीत ५० टक्के कपात, गाळ्यांचा दहा दिवसांत निर्णय घेणे, मिळकतीच्या नोंदी घेणे, जीआयएस सर्व्हे पूर्ण करणे, वसुलीत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दोन वेतनवाढी रोखणे, महापौर आयुक्तांच्या कार्यालयाचे सुशोभीकरण करणे अशा सूचना शिफारशी करून स्थायी समितीने अंदाजपत्रक सभागृहाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले.
विरोधी पक्षाने आयुक्तांच्या बजेटपेक्षा ६३ कोटींनी वाढ करत ८९१ कोटींचे बजेट सुचवले. त्यात एलबीटी, हद्दवाढ आणि शहर कर या विभागाचा समावेश आहे. स्थायी सत्ताधारी वर्गाने सुचवलेले बजेट फुगवे असल्याचा आरोप विरोधी पक्षाचे चंद्रकांत रमणशेट्टी यांनी केला. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
ठळक वैशिष्ट्ये
Áपेठवाईज सर्व्हे करून वसुली करणे
Á अनधिकृत बांधकामास दंड आकारणी
Á नोटरी व्यवहारास मालमत्ता नोंदीसाठी संमती
Á जीआयएस प्रमाणे वसुली करा
Á गाळे भाडेवाढीचा दहा दिवसांत निर्णय घ्या
Á अनधिकृत फलकाबाबत दक्ष रहावे
Á कर आकारणीस सहाय्यक आयुक्त नियुक्त करा
Á बोगस नळ शोधमोहीम तत्काळ सुरू करा
Á वसुली घटल्यास कर्मचारी अधिकाऱ्यांच्या दोन वेतनवाढ रोखाव्यात
Á महापौर आयुक्त निवासस्थानाचे सुशोभीकरण
Á मनपा सभागृह रंगरंगोटी करणे
Á मनपा रुग्णालयांची सुधारणा औषध खरेदी करा

अंदाजपत्रकात महसुली जमा (कोटीत)
स्थायी अायुक्त
आरंभी शिल्लक २.५७ २.५७
पाणीपुरवठा ६९.१५ ६९.१५
महसुली ६७५.३७ ४३१.८८
एकूण ७४४.५५ ५०१.०६
अंदाजपत्रकात भांडवली कामे (कोटीत)
भांडवली कामे ३२७.८० १०४.६८
अनुदानातून कामे १५३.१० १५३.१०
कर्ज ४० ४०
विशेष अनुदान १५ १५
विकासकाम अनुदान १५ १५
एकूण ५५०.९० ३२७.७८
महसुली भांडवली एकूण १२९५.४५ ८२८.८५
बातम्या आणखी आहेत...