आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंप चालू झाले,पण पाणी कालव्यात पडलेच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - दोनदिवसांच्या प्रयत्नांनी अखेर शिरापूर उपसा सिंचनचे पंप चालू झाले. परंतु प्रशासनातील समन्वयाआभावी पाणी कालव्यात पडू शकले नाही. त्यामुळे शिरापूरच्या पाण्याची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली.
सीना नदी दुथडी भरून वाहत सल्यामुळे शिरापूर उपसा सिंचन योजनेची चाचणी घेण्याची रानमसले, बीबीदारफळमधील शेतकऱ्यांनी भीमा लाभ क्षेत्र अधीक्षकाकडे मागणी केली होती. पहिल्या टप्प्यातील पंपगृहातील पंप चालूच होत नव्हते. यासाठी पुणे येथून तंत्रज्ञ बोलवले आहेत. त्यांनी दोन दिवस काम करून त्यातील तांत्रिक दोष दूर केले आहेत. गुरुवारी दुपारी चारपैकी दोन पंप चालू करण्यात यश आले. पुढे पाणी चालू ठेवण्यासाठी स्थापत्य विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने पंप बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

शिरापूर उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा दीर्घकाळानंतर पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यात मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे सीना नदीतून पाणी उचलून ते लोकमंगल कारखान्याजवळ कालव्यात सोडले जाणार आहे.

तेथून ते कालव्यातून नान्नज -मोहितेवाडी जवळ दुसऱ्या टप्प्यातील पंप गृहात येणार आहे. तेथून दुसऱ्या टप्पा चालू होतो. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.

अधिकारी नसल्याने पंप बंद
तांत्रिक अडचणींमुळेपंप चालू होत नव्हते. आता ते दोष दूर झाले आहेत. पंप चालू ठेवण्याची स्थापत्य विभागाची जबाबदारी आहे. अधिकारी नसल्याने पंप चालू ठेवता आले नाहीत सुहासकानडे, तंत्रज्ञ, पाटबंधारे विभाग, पुणे

वेल्डिंग इतर कामे अपूर्ण
काही ठिकाणी वेल्डिंगची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. ही कामे पूर्ण झाली की लगेच चाचणी घेण्यात येईल. पाटबंधारे विभागाचीही अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. एस.के. हारसुरे, प्रभारी अभियंता, शिरापूर योजना
बातम्या आणखी आहेत...