आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत शहरात पाण्यासाठी शिमगा, औज बंधाऱ्यात दहा दिवसाचा साठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात १.७० मीटर इतका पाणीसाठा असून यातून शहराला नऊ ते दहा दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल इतके पाणी शिल्लक आहे. शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात तत्काळ पाणी सोडणे आवश्यक असून, तसे पत्र महापालिकेने सिंचन विभागास दिले आहे. दोन दिवसात पाणी नाही सोडल्यास ऐन दिवाळीत शहरात पाण्यासाठी शिमगा करण्याची वेळ येणार आहे.

उजनी धरण आणि औज बंधारा येथून शहराला पाणीपुरवठा होतो. या ठिकाणाहून रोज १०० एमएलडी पाणी मिळते. त्यापैकी औज बंधारा येथे १.७० मीटर इतका पाणीसाठा असून, ते पाणी नऊ दिवस पुरेल इतके आहे, अशी माहिती मनपा सार्वजनिक नगर अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली.

उजनीतून भीमा नदीत दोन दिवसात पाणी सोडावे, अशी मागणी मनपाने जिल्हाधिकारी, शासन, उजनी लाभक्षेत्राकडे सोमवारी केली. यापूर्वी दोन वेळा मनपाने पत्र दिले आहे. दोन दिवसात उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडल्यास औज बंधाऱ्यात येण्यास दहा दिवस लागेल. अन्यथा शहरात दिवाळीत पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
बातम्या आणखी आहेत...