आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी मिळाले ६४१ रुपयांचे, वसुली होते २७५६ रुपयांची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - औज बंधाऱ्यातून शहर पाणीपुरवठ्यासाठी जितके पाणी उचलले जाईल तितके कच्च्या पाण्याचे बिल भरू, अशी भूमिका महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी घेतली असून, त्यानुसार शासनाबरोबर चर्चा सुरू केली आहे. दुसरीकडे शहरातील नागरिकांकडून चालू आर्थिक वर्षात ८५ दिवस पाणीपुरवठा करून ३६५ दिवसांचे बिल वसूल करण्यात येत आहे. मनपाची वार्षिक पाणीपट्टी २७५६ रुपये आहे. त्यानुसार ८५ दिवस पाणी देत असेल तर ६४१ रुपये पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. पाणी बिलाबाबत मनपाने शासनाकडे जी भूमिका मांडली आहे तीच भूमिका नागरिकांच्या पाणी बिलाबाबत का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित होताे. मनपा पाणीपुरवठ्यावर २०१५-१६ या वर्षात सरासरी ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही शहराची पुरेशी तहान भागत नाही.
सोलापूर महापालिका अर्धा इंची पाइपद्वारे शहरातील मिळकतींना पाणीपुरवठा करते. घरगुती अर्धा इंची नळ कनेक्शनसाठी मनपाकडून वार्षिक २७५६ रुपये पाणीपट्टी आकारणी केली जाते. (अर्धा इंचीच्या पुढे नळजोड असल्याने रक्कम वाढेल)वार्षिक पाणीपट्टीचे गणित घातल्यास रोजच्या पाणीपुरवठ्याचे ७.५५ रुपये होतात. शहरात सध्या चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. यंदाच्या वर्षात ३६५ दिवसांपैकी ८५ दिवसच पाणीपुरवठा झाला. त्यानुसार हिशेब घातल्यास ८५ दिवसांची पाणीपट्टी ६४१ रुपये होते. महापालिका मात्र ८५ दिवस पाणीपुरवठा करून २७५६ रुपये आकारणी करते. औजमधील पाणी घेण्याबाबत महापालिकेने जी भूमिका घेतली तशीच भूमिका शहर पाणीपुरवठ्याबाबत घेणे आवश्यक आहे.

पाणीपट्टी कमी करणार नाही
माझ्या कार्यकाळात तीन, चार आणि पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिका चालवायची अाहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बंद करता येत नाही. पाणीपुरवठा विभाग चालवण्यासाठी उत्पन्न हवे. महापालिका सभागृहात पाणीपट्टी माफीचा ठराव केला तरी ते मान्य होणार नाही. पदाधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यास मनपा अधिकारी याबाबत उत्तर देतील. विजयकुमारकाळम-पाटील, मनपाआयुक्त

प्रशासनाची दुटप्पी भूमिका
शासनाकडे पाणी मागताना वापरलेल्या पाण्याचे पैसे देण्याची भूमिका मांडता. दुसरीकडे नागरिकांना मात्र ८५ दिवस पाणी देऊन ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारणी करता. ही प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे. पाणीपट्टी कपात करा असा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला पण अंमलबजवणी नाही. प्रशासन सत्ताधाऱ्यांचे ऐकत नसेल तर अॅड. यू. एन. बेरियांसह सर्वांनी राजीनामा द्यावा. प्रा.अशोक निंबर्गी, नगरसेवक(भाजप)

४५ दिवसांची पाणीपट्टी घ्या
पाण्याच्या विषय सर्वांना कळून चुकला आहे. सभागृह आणि प्रशासन यांच्यात चेंडू इकडून तिकडे टाकण्याचा प्रयत्न अाहे. ८५ दिवस पाणी दिले पण त्यात पाणी किती वेळ, किती दबाने, कोणत्या वेळी दिले हे पाहा. ३६५ दिवसांचे पाणीपट्टी कशासाठी द्यायची. ४५ दिवसांची पाणीपट्टी महापालिकेने घेतली पाहिजे. जितके दिवस पाणी तितके पाणीपट्टी. विद्याधरदोशी, नागरिक
ठरावाची अंमलबजावणी नाही

नागरिकांनाजितके दिवस पाणी देता तितके पाणीपट्टी आकारणी करा असा ठराव केला. प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. पाण्याबाबत आम्ही गंभीर आहाेत. महापालिका सभागृहात मी जाब विचारणार आहे. शासनाकडे जितके पाणी घेतो तितकी रक्कम भरतो, असे आयुक्त म्हणतात. तोच फार्म्युला नागरिकांच्या बाबतीत वापरावा, अशी भूमिका मांडू. अॅड.यू. एन. बेरिया, नगरसेवक(काँग्रेस)

औज येथील संग्रहित छायाचित्र ६० कोटी खर्च करूनही पाणी नाही
पाणीपुरवठ्यासाठी ६० कोटी खर्च करूनही पाणी नाही. पाण्याची उपलब्धी असताना पाण्याचे नियोजन होत नाही. मागील वर्षी हिप्परगा तलावातील उपसा बंद होता. उजनी आणि औजमधून पाणीपुरवठा होत असताना शहरात साधारण तीन दिवसांआड पाणीपुरठा करण्यात आला.
(मान्य अंदाज)

~ ६०.४९
~ ३५.११
~ ३८.२५
~ ३३.५०
सन २०१५-१६
सन २०१४-१५
सन २०१३-१४
सन २०१२-१३

मनपा सभागृहात पाणीपट्टी कपातीचा ठराव विखंडित
जितका पाणीपुरवठा तितकीच पाणीपट्टी आकारणी करावी, अशी मागणी नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया, सुरेश पाटील यांनी केली. आमदार प्रणिती शिंदे यांनीही तशी मागणी महापालिका आयुक्तांकडे भेटून केली. त्यानंतर पाणीपट्टी कपातीचा ठराव महापालिका सभागृहात झाला, पण तो ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला.

२०१५-१६ वर्षातील पाणीपुरवठा
ते२९ एप्रिल २०१५ (तीन दिवसांआड)
३० एप्रिल ते मे (चार दिवसांआड )
ते १० मे (तीन दिवसांआड)
११ मे ते मार्च २०१६ (चार दिवसांआड) ७४
ते १७ मार्च (पाच दिवसांआड)
एप्रिल २०१५ ते १७ मार्च २०१६ - एकूण८५ दिवस
बातम्या आणखी आहेत...