आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण व्यवस्थेचे दोष तसेच, मात्र जलाशय पाहणीची टूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला रोज पाणीपुरवठा होऊ शकेल इतका पाणीसाठी तिन्ही जलस्रोतात उपलब्ध आहे. त्यामुळे रोज पाणीपुरवठा करण्याविषयी बैठ घेणार असल्याचे महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी सांगितले. त्यानंतर जलाशयांना भेटी देणे सुरू केले. पुरेसे पाणी उपलब्ध असले तरी वितरण व्यवस्थेत दोष असल्याने महापालिका रोज पुरवठा करू शकत नाही. हे दोष शोधून दूर करण्याचे काम सुरू करण्याऐवजी जलाशयांना भेटी देण्याचे काम पदाधिकारी करत आहेत.
शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक तितके पाणी उपलब्ध आहे. त्यासाठी उजनी, औज बंधारा येथे मुबलक तर हिप्परगा तलावात कमी प्रमाणात पाणी आहे. शहरातील वितरण व्यवस्थेत त्रुटी आहेत हे स्पष्ट होत असताना महापालिका पदाधिकारी त्यावर चर्चा करून निर्णय अपेक्षित असताना धरणास भेटी देत आहेत.

उजनी, हिप्परगा आणि उजनी धरणातून शहरासाठी रोज ११० एमएलडी पाण्याची उपलब्धी आहे. या पाण्यावर एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य अाहे. पण शहरातील वितरण व्यवस्थेतील त्रुटीबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. शहरातील किती पाण्याच्या टाक्या ग्रॅव्हॅटिने भरतात, किती टाक्यांचा वापर केला जातो. जुळे सोलापूर एमबीआर टाकी सुरू करता येईल का? त्यासाठी प्रशासनाने काय केले. आसरा पुलाजवळ रेल्वे क्राॅसिंग करून पाइपलाइन टाकण्याचे कामाची प्रगती काय? शहरातील जलवाहिनीची स्थिती काय? समान पाणी देण्यासाठी प्रशासनाकडे काय नियोजन आहे. एका प्रभागात पाच ते सहा तास तर एका प्रभागात दोन तास पाणीपुरवठा केला जातो हे कशामुळे होतो.

उतीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. चावीवाले अन्य तीन दिवस काय करतात. ते राजकीय बळी ठरतात का? आजही शहरातील काही भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तेथे जलवाहिनी टाकली नाही. त्याचे कारण काय? पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया जाते यास जबाबदार कोण आदी प्रश्न आहेत. याकडे लक्ष देऊन पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील नियोजन करणे आवश्यक असताना महापालिका पदाधिकारी मात्र औज उजनी दौरे करत आहेत.

बुधवारी उजनी दौरा
महापौर सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक बाबा मिस्त्री, सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव, उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी बुधवारी उजनी येथे भेट देऊन पाण्याचे पूजन केले. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे असे महापौर आबुटे यावेळी म्हणाल्या.

प्राधिकरणाने वेधले होते लक्ष
पाणीटंचाईच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही वितरण व्यवस्थेतील दोषांकडे लक्ष वेधले होते. त्याला काही महिने झाले. परंतु पालिकेने हे दोष दूर करण्यासाठी काहीही केले नाही. येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे काम सुरू आहे.

आयुक्तांना पत्र दिले
^एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. वितरण व्यवस्थेबाबत बैठक घेणारआहे. दिल्लीत स्मार्ट सिटी कार्यशाळा संपल्यावर बैठक घेऊन पाण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करू.” प्रा.सुशीला आबुटे, महापौर
बातम्या आणखी आहेत...