आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षानंतर दोन दिवसांआड, तरीही काही भागांत रात्री बारानंतर पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - शहरात तब्बल अडीच वर्षानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठ्यास शुक्रवारी सुरुवात झाली. परंतु, याच वेळी अक्कलकोट रोड, विडी घरकुल, कुंभारी रोड, विनायक नगर, अक्कलकोट नाका, शेळगी, दहिटणे, मजरेवाडीचा काही भाग, नीलम नगर, कर्णिक नगर आदी परिसरात रात्री १२ नंतर पाणीपुरवठा होणार आहे. या भागात कामगार नोकरदार वर्ग अधिक आहे. दिवसभर काम करून आल्यानंतर मध्यरात्री पाणी येणे त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे रात्री नऊच्या आत पाणीपुरवठा करा. नाही तर आमचा विरोध असेल, अशी भूमिका नगरसेवक अविनाश पाटील यांनी मांडली आहे.
शहरासाठी सध्या हिप्परगा तलावातून ५, औज येथून ८० तर उजनीतून ७५ असे १६० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. एमआयडीसी आणि गळती मिळून ६० एमएलडी वजा केल्यास शहराला १०० एमएलडी पाणी उपलब्ध होते. शहराची आजची गरज १९० एमएलडी आहे, असे मनपा प्रशासनाकडून सांगितले जाते. शासकीय नियमानुसार शहराची दहा लाख लोकसंख्या धरल्यास १५० एमएलडीची गरज आहे.

^रात्री बाराच्या आत पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही सकारात्मक आहोत. पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आठ दिवस लागतील. नागरिकांनी पाणी घेणे संपल्यावर नळ बंद करावा. त्यामुळे पुढील घरास पाणी मिळेल. मुकुंदभालेराव, सार्वजनिक आरोग्य अभियंता, मनपा
दिवसाआड आणि कालावधी
-१४ मार्च २०१३
- १५ मे २०१३
- २९ जुलै २०१३
- १६ आॅक्टोबर २०१३
- ३१ आॅक्टोबर २०१३
- १० एप्रिल २०१४
- ३० एप्रिल २०१५
- मार्च २०१५
- एप्रिल २०१६
- १२ एप्रिल २०१६
- १० जून २०१६
- १५ आॅगस्ट २०१६
- आॅक्टोबरपासून
बातम्या आणखी आहेत...