आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यात हिप्परगा तलाव पातळी वाढल्यास देणार 3 दिवसांआड पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला पाणीपुरवठा करणारे उजनी धरण आणि औज बंधारा येथे पुरेसा पाणीसाठा आहे. हिप्परगा तलाव येथे पाण्याची पातळी अर्धा फूट वाढली तर तेथून पाणीउपसा करण्यात येईल. त्यानंतर शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे, अशी माहिती महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता मुकुंद भालेराव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
चार ऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपा करत आहे. उजनी आणि औज बंधारा येथून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करण्यात येत आहे. याशिवाय हिप्परगा तलाव येथे जॅकवेलच्या ठिकाणी एक मीटर पाणीसाठा आहे. अर्धा फूट पाणी आल्यावर तेथील पंपिंग सुरू करण्यात येईल. त्यापूर्वी भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रातील कामे पूर्ण करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

पुढील आठवड्यात हिप्परगा तलावात पुरेसा पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती मनपा पाणीपुरवठा अधिकारी भालेराव यांनी दिली. शहरासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध असून, तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असे नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले.
पुणे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या विसर्गात विक्रमी वाढ झाली आहे. बुधवारी रात्री उजनी धरणामध्ये ७० हजार क्युसेक तर वीर धरणातून नीरा नदीत ५० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. बुधवारी दुपारी वीर धरणाचे दरवाजे फुटांनी उघडून हा प्रवाह नीरा नदीत सोडण्यात आला. वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीकाठावरील ११० गावांना सोलापूर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेली तीन-चार दिवस सातारा जिल्ह्यातील वीर धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने आठ दिवसांपूर्वी रिकामी असलेली धरणे तुडुंब भरली. दक्षता म्हणून सातारा लाभक्षेत्र प्राधिकरणाने वीर धरणातून नीरा नदीत दुपारी १२.३० वाजता २१ हजार क्युसेकने तर सायंकाळी वाजता ५० हजार क्युसकने पाणी सोडले. रात्री उशिरा यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता सोलापूर जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. भीमेच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता, नदीकाठावरील ११० गावांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी संबंधित गावांचे तलाठी यांना दिले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिली. सायंकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार दौंडचा विसर्ग २५ हजार ९३३ तर बंडगार्डनचा विसर्ग ३८ हजार ६०८ क्युसेक इतका होता.

रात्री यामध्ये १० ते १५ हजारांनी वाढ होणार असल्याचे लाभक्षेत्र अधिकारी यांनी स्पष्ट केले. सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये वजा ४०८.३२ मीटर इतका उपयुक्त पाणीसाठा तर वजा २६.९१ टक्के इतकी पाणीपातळी आल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सकाळपासून पाणीपातळीमध्ये वेगाने वाढ होत आहे.

धरणांचा सोमवार बुधवार
{वीर : ५७ % ९१%
{भाटघर : ६१% ७५%
{ नीरा देवघर : ६२% ८७%

नीरा नदी कालव्यांच्या वरील धरणात झपाट्याने उपलब्ध झालेला पाणीसाठा
(सोमवारबुधवारची टक्केवारी तुलनात्मक)

मागील वर्षीपेक्षा पाणीसाठा कमीच...
पाऊस कमी असतानाही मागील वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उजनीची उपयुक्त पाणीपातळी वजा टक्के इतकी होती. यंदा हीच पाणीपातळी वजा २७ टक्केवर आहे. मागील दोन दिवसांपासून विसर्ग वाढल्याने पाणीपातळीही वाढत चालली आहे. जोपर्यंत धरणाची पाणीपातळी वजा राहणार आहे, तोपर्यंत सोलापूरकरांची चिंता कायम राहणार आहे.

खडकवासला : ४० हजार क्युसेक विसर्ग
उजनीत बुधवारी रात्री ७० हजार क्युसेक्सने पाणी येत होते. यात खडकवासला धरणातून ४० हजार, चासकमान धरणातून १२ हजार, मुळशी धरणातून हजार, कासारसाई धरणातून १२८१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे पुणे सिंचन भवनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...