आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जुळताजुळेना, औजमध्ये पाणी येऊनही पाणीपुरवठा विस्कळीतच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनीतून सोडलेले पाणी औज बंधाऱ्यात आले. त्यामुळे टाकळी येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे मागील दहा-बारा दिवसांपासून शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे नाव घेत नाही. हद्दवाढ भागासह शहरातील बहुतेक नगरात नऊ दिवसांआड पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहे. दरम्यान, विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवस लागतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता राजकुमार रेड्डी यांनी दिली.
उजनी येथे तीन पंप पूर्ण क्षमतेने चालवताना वारंवार व्यत्यय येत आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील हे पाकणी जलशुध्दीकरण केंद्रावर ठाण मांडून होते.
पाकणी येथील पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी पहाटे तीन वाजता भवानी पेठ पंप हाउस येथे भेट दिली. उजनीतील पाणी पातळी कमी झाल्याने शहराच्या गरजेनुसार पाणीपुरवठा होत नसल्याची स्थिती आहे.

जयंती मिरवणूकमुळे आज पाणीपुरवठा
रविवारी डाॅ. आंबेडकर जयंती मिरवणूक असल्याने शहरातील दलित वस्ती भागात शनिवारी पाणीपुरवठा करावा अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली. त्यानुसार परिपत्रक काढले. त्यानुसार पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे घोंगडे वस्ती, जुनी मिल चाळ येथे पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांत सुरळीत
^मागील आठदिवसांपासून शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने तो सुरळीत करण्यास दोन दिवस लागेल. त्यानंतर शहरातील पाणीपुरवठा निश्चित करण्यात येईल.'' राजकुमार रेड्डी, प्र.सार्वजनिक आरोग्य अभियंता. मनपा