आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 रुपयांत मिळणार पाणी, रुपयाला ग्लास, स्थानकावर वॉटर वेंडिंग मशिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - रेल्वेप्रवाशांना डबल फिल्टर्ड शुद्ध पाण्याची बॉटल आता अवघ्या पाच रुपयांत मिळणार आहे. सोलापूर स्थानकावर लवकरच शुद्ध पाणी देणारे वॉटर वेंडिंग मशिन बसविण्यात येईल. ज्या प्रवाशांना एक ग्लास पाणी हवे आहे त्यांना फक्त एक रुपया द्यावा लागेल, ज्यांना एक लिटरची बाटली हवी आहे त्यांना मात्र एका लिटरसाठी पाच रुपये माेजावे लागतील. सप्टेंबरअखेरपर्यंत स्थानकावर असे सहा तर विभागातील विविध स्थानकांवर मिळून ४५ मशिन बसवण्यात येणार आहे.
आयआरसीटीसी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने देशातील वन दर्जाच्या रेल्वे स्थानकावर वॉटर वेंडिंग मशिन बसवण्याचे काम सुरू आहे. मुंबईसह अन्य महत्त्वाच्या स्थानकावर वॉटर वेंडिंग मशिन बसविण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकतेच अशी मशिन बसविणाऱ्या २४ रेल्वे स्थानकांची यादी जाहीर केली आहे. यात मध्य रेल्वेच्या केवळ सोलापूर स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित स्थानकांमध्ये लखनौ, दिल्ली, विजयवाडा, चेन्नई आदी प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला. स्थानकावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ही मशिन बनविण्यात आली आहे. या मशिनमधून एका तासात जवळपास हजार लिटर पाणी दिले जाऊ शकते.

सहा मशीन बसवणार
प्रवाशांना चांगल्या दर्जाचे पाणी मिळावे म्हणून आयअारसीटीसीच्या मदतीने सोलापूर स्थानकावर सहा वॉटर वेंडिंग मशिन बसविण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे मशिन बसविण्यात येतील. मनिंदर सिंगउप्पल, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक.
बातम्या आणखी आहेत...