आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही- डाॅ. पाटणकर यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- येथीलश्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरातील पूजा निधीतून अवमानकारक पुरुषसूक्त काढून टाकल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ.भारत पाटणकर यांनी दिला. तसेच आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात कृती करण्याचा निर्णय द्यावा, अन्यथा त्यांना श्री विठ्ठल पूजेसाठी मंदिरात जावू देण्याचा निर्णय विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन आणि श्रमिक मुक्ती दलाने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. पाटणकर म्हणाले, विठ्ठल मंदिरातून बडवे हटाव चळवळीच्या विजयानंतर विठ्ठल रखुमाई मंदिर बडवे आणि उत्पात यांच्या कचाट्यातून मुक्त झाले. विठ्ठल रखुमाई स्वत: ही या मंडळींच्या जाचातून मुक्त झाले आहेत. हा संघर्ष सुमारे ५० वर्षे चालल्यानंतर यशस्वी झाला. त्यामुळे या पाठोपाठ दुसरा संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन आणि श्रमिक मुक्ती दलाने हाती घेतला. कारण बडवे, उत्पात हटाव मागणीबरोबरच विठू माऊली, संतपरंपरा वारकरी परंपरा यांना अवमानकारक असणारे पुरुषसूक्त हे विठुमाऊलीच्या पूजाविधीच्या प्रक्रियेतून काढून टाकण्याची मागणी पूर्वीपासूनच केलेली होती.

राज्याच्या सत्तेवरुन पायउतार झालेल्या आघाडी सरकारनेही नुसते हो हो म्हणून प्रत्यक्षात यासंदर्भात कोणतीही कृती केली नाही.
बातम्या आणखी आहेत...