आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: तुळसी विवाहानंतर विवाह मुहूर्ताचा योग सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील दोन-चार महिन्यांपासून विवाह तिथींना लागलेला ब्रेक नुकताच उठला आहे. अधिक मास, गुरुपालट चातुर्मास यामुळे विवाहतिथी नव्हती. आता आयुष्याचे रेशमबंध बांधणाऱ्यांसाठी पुन्हा सुरुवात झाल्याने सर्वत्र लगीनघाईस सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
दीड महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आता पुन्हा विवाह सोहळ्यांना प्रारंभ झाला आहे. यातच डिसेंबर जानेवारीत सर्वाधिक विवाहतिथी असणार आहेत.
डिसेंबरमध्ये तब्बल ११ तर जानेवारीमध्ये संक्रांतीचा काळ सोडला तर जवळपास १२ मुहूर्त आहेत. सर्वात कमी एप्रिलमध्ये विवाहयोग्य मुहूर्त आहेत. यंदाच्यावर्षी अधिक मासाचा काळ वाढल्याने लग्नांना योग्य मुहूर्त नव्हते. परंतु मागील आठ दिवसांत परत लग्नासाठीची बँड, बाजा आणि बारातची धूम सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेतही विविध प्रकारची खरेदी आणि कपड्यांचे बस्ते बांधण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यातही विवाहाचे मुहुर्त होते. त्यामुळे लग्नसमारंभासाठी धावपळ दिसून आली.

एप्रिलमध्ये केवळ तीनच
1,2,3 असे केवळ तीनच विवाहयोग्य मुहूर्त आलेले आहेत. त्यामुळे या महिन्यात केवळ तीनच दिवशी विवाह होतील. (लाटकर, दाते, राजेंदेकर पंचांगानुसार)

आता लगीनघाईच
अधिक महिना झाला. गुरू-शुक्राचे अस्त आणि चातुर्मास यांच्या प्रदीर्घ अशा चार महिन्यांच्या लांबीमुळे हा काळ लांबला होता. प्रत्येक महिन्यात वाढ दिवस आल्याने असा प्रसंग काही वेळेस येतो. त्यामुळे आता लगीनघाईस सुरुवात झाली आहे. पंडित पंकज महाराज कुलकर्णी, पुरोहित
पुढे वाचा.. डिसेंबरमधील मुहूर्त