आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लू व्हेल गेमपासून करा बचावाचा संदेश देत सोलापूरात लाडक्या बाप्पांचे स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ब्लूव्हेल गेमपासून करा बचाव, बेटी बचाव, स्वच्छ भारत मोहीम, चिनी मालावर बहिष्कार, वृक्ष लागवड, स्त्री-पुरुष समानता आदी सामाजिक संदेश देत बाप्पांचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जंगी स्वागत केले. झांज पथक, ढोल, लेझीम अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 

मंडळांसह घरोघरी विधिवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा बाप्पांच्या स्वागतासाठी गुलाल, अारगजा याचा वापर करता काही मंडळांनी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी दुपटीहून अधिक भाविकांनी घरोघरी पर्यावरणपूरक श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 

ताता गणपती, आजोबा गणपती, बाळीवेस, नवी पेठ, पाणीवेस लोकमान्य, पूर्व विभाग, विजापूर रोड, विडी घरकुल, होडगी रोड मध्यवर्ती मंडळांकडून वाजत गाजत मिरवणूक काढत विविध िठकाणी मूर्ती प्रतिष्ठापना केली. मानाचा श्रीमंत कसबा गणपतीची मिरवणूक पार्क चौक येथून काढण्यात आली. 

महापौर शोभाताई बनशेट्टी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते आरती केली. महापौर महिला कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून मिरवणुकीची सुरुवात केलीे. महिलांच्या लेझीम ढोल पथकांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी बेटी बचाव, स्वच्छ भारत अभियान, चिनी मालावर बहिष्कार आदी पोस्टरव्दारे प्रबोधन केले. तसेच शेतकऱ्यांचे प्रतीक असलेल्या बैलांच्या जोड्यादेखील मिरवणुकीत आणल्या होत्या. 

सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीची पूजा चार पुतळा येथे महापौरांच्या हस्ते करण्यात आली. चाळीसहून अधिक मुख्य मंडळांनी मिरवणूक काढली. सुमारे दीड हजार मंडळांनी प्रतिष्ठापना केली आहे. मध्यवर्ती मंडळातर्फे शिवानुभव मंगल कार्यालयात ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 

शहरातील विजापूर रोड, होडगी रोड, अासरा चौक, कन्ना चौक, पुंजाल मैदान, नीलमनगर, कुमठा नाका, लष्कर परिसर, टिळक चौक, नवी पेठ आदी भागात मूर्ती घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. पूजेसाठी लागणारे साहित्य, पाच फळे आदी साहित्य करण्यासाठी लगबग सुरू होती. सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टतपर्फे श्री ची प्रतिष्ठापना करुन अध्यक्ष अॅड. गौरीशंकर फुलारी चिदानंद वनारोटे यांच्या हस्ते पूजा करण्यात आले. 

सकाळी वाजल्यापासून रुद्रपठण, अर्थवशिर्ष पठण रुद्राभिषेक महाआरती केली. यावेळी अनिल सावंत,चंद्रकांत कळमणकर,रामचंद्र रेळेकर, सोमनाथ मेंडके, योगेश फुलारी, अनिल नंदीमठ, अण्णाराव गवसने, सातलिंगप्पा दुधनीकर, मिरण अक्कलकोटे,सागर कोपद आदी उपस्थित होते. 

विद्युत माळा महागल्या
‘जीएसटी’मुळे विद्युत माळा थाेड्याशा महागल्या होत्या. परंतु चिनी माळांचे दर स्वस्त होते. परंतु काही गणेशभक्त जाणीवपूर्वक त्याला नकार देत होते. ‘स्वदेशी’चा हा जागर यंदा पहिल्यांदाच अनुभवल्याचे विक्रेते गणेश कन्ना म्हणाले. 

इको-फ्रेंडली साहित्य
भक्तगणांनी कागदी साहित्याला यंदा मोठी पसंती िदली. कागदी झुरमुळे, फुले, शोभेच्या कुंडी आदी साहित्याला मोठी मागणी होती. एकूणच पर्यावरणपूरक वस्तूंकडे कल दिसून आला. प्लास्टिकच्या वस्तूंना तुलनेने मागणी कमी होती. 

गुलाल उधळणे टाळले
गुलालावर १८ टक्के ‘जीएसटी’ लावल्याने त्याचे दर वाढले. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तो अधिक प्रमाणात उधळला नाही. याबाबत विचारले असता विक्रेते म्हणाले, “प्रतिष्ठापनेच्या दिवशी उधळण कमी होते. 

पावसाचीही हजेरी 
शहरातदोन ते तीन दिवसांपासून विसावलेल्या पावसाने बाप्पांच्या आगमनाबरोबर हजेरी लावली. शहरातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. विविध िठकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या श्रींच्या मूर्ती खरेदी करण्याचा उत्साह जैसे थे होता. नागरिकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आनंदमय वातावरणात उत्सवाला सुरुवात झाली. १२ दिवस उत्सव असल्याने शहरातील विविध मंडळांकडून सामाजिक उपक्रम घेतले जाणार आहेत. 

वेळ वाढवून घेण्यासाठी प्रयत्न 
यंदाचा उत्सव १२ दिवसांचा आहे. मध्यवर्तीचे आठ विभाग असून, प्रत्येक विभागातील अध्यक्ष पदाधिकारी उत्सव शांततेत पार पाडतील. मंडळांकडून उत्कृष्ट देखावे करण्यात येतात. रात्री दहानंतर सर्व बंद ठेवावे लागत आहे. शेवटचे चार दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक देखावे पाहण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली जाणार आहे.
- श्री शैलबन शेट्टी, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

सुमारे १५०० मंडळांनी काढली मिरवणूक 
अतिशय जल्लोषात बप्पांचे अागमन झाले. सुमारे दोन हजारपेक्षा अधिक पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी होता. रात्री साडेनऊपर्यंत १३०० मंडळांनी मिरवणूक काढून स्थापना केली. अाणखी मंडळांची मिरवणूक सुरूच होती. १६५८ मंडळांनी नोंदणी केली अाहे. पोलिस अायुक्त, उपायुक्त, सहायक अायुक्त, पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी मंडळांशी संवाद साधत होते. शांततेत अाणि उत्साहात मिरवणुका निघाल्याची माहिती पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 
 
‘जीएसटी’ अन् चिनी मालाची चर्चा 
विद्येची देवता विनायकाचे शुक्रवारी मोठ्या थाटामाटात आगमन झाले. त्याच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये मोठी खरेदी झाली. सजावटीच्या साहित्यापासून मोदक घेण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. प्रत्येक ठिकाणी एक चर्चा मात्र जरूर होती, ‘जीएसटी’ अन् चिनी मालाची. गेल्या वर्षीच्या तुलनेत सजावट साहित्याचे दर स्थिर होते. परंतु त्याला ‘जीएसटी’(वस्तू, सेवाकर)ची झालर होती. चिनी मालाला नकार होता. या दोन्ही गोष्टी यंदाच्या बाजारपेठेत नवीन होत्या. 

शहरातील मधला मारुती, टिळक चौक, पूर्व मंगळवार पेठ, बाळीवेस, कन्ना चौक, जोडबसवण्णा चौक, पुंजाल क्रीडा मैदान आदी ठिकाणी गणेशमूर्तींची विक्री झाली. तिथेच सजावटीचे साहित्य होते. मिठाई, फळे होती. इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनात आकर्षक अशा वस्तू आल्या होत्या. त्यावर १८ टक्के जीएसटी लावलेली होती. बड्या गणेशभक्तांनी त्याला पसंती दिली. छोट्या गणेशभक्तांसाठी थर्माकोलचे मखर अतिशय आकर्षक होते. परंतु ते पर्यावरणपूरक नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...