आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॅस ग्राहकांत १५० व्हॉट्सअॅप ग्रुपमधून अधिकारावर जागृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घरगुती गॅस विकत घेताना, वितरकांच्या कर्मचाऱ्यांकडून अधिक पैशाची सातत्याने मागणी होते. दिले नाही तर सिलिंडर परत नेला जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या दीडशे ग्रुपमधून जनजागृती सुरू झाली आहे. सुमारे ५० हजार ग्राहक या जाळ्याशी जोडले जातील. त्यांना तक्रार करण्याची पद्धत, त्याचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक मिळवून देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे.
शहराच्या पूर्वभागात पद्मसेना प्रतिष्ठानने हा कार्यक्रम हाती घेतला. त्याचे प्रमुख प्रा. व्यंकटेश पडाल यांनी हा गैरप्रकार बंद करण्यासाठी वितरक, गॅस कंपनी, पुरवठा अधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. पण त्याची अपेक्षित दखल घेतली गेली नाही. वितरकही ऐकत नाहीत. कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात. या प्रकाराच्या विरोधात जनक्षोभ वाढला पाहिजे. सरकारी यंत्रणेकडूनच कारवाई व्हायला पाहिजे. यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याची माहिती प्रा. पडाल यांनी दिली.

कसे सामील व्हाल?
प्रा. पडाल हे ग्रुपचे अॅडमिन आहेत. पूर्वभागातील विविध वसाहतींचे ग्रुप बनवले. त्यांच्या ९८५०९९७३३७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अँड्रॉइड मोबाइल नसेल तर एसएमएसची सुविधाही ते देण्यास तयार आहेत. एकूणच कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबावी, हाच यामागचा उद्देश आहे.

ग्राहक राजा जागा हो!
^कुठल्याही नोकरदाराला ग्राहकांकडून अधिक पैसे घेण्याची बाब मालकाला कळेल, अशी भीती असते. परंतु गॅस वितरण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अशी कुठलीच भीती नाही. बिनदिक्कतपणे ही मंडळी पैशाची मागणी करतात. दिले नाही तर सिलिंडर परत नेतात. म्हणजेच यांचा बोलावता धनी कोण? हे जाणून घेण्यासाठी ग्राहक राजा जागा हो, म्हणण्याची वेळ आली आहे.”
प्रा.व्यंकटेश पडाल, पद्मसेना प्र
तिष्ठानचे प्रमुख
१. गॅस कंपन्या दरमहा एक तारखेला गॅसचे दर जाहीर करतात. माहिती त्याच दिवशी मिळेल.
२.गॅस घेताना, पावती जरूर घ्यावी. देत नसतील तर संबंधित वितरकाकडे तातडीने तक्रार नोंदवावी.
३.सिलिंडरचे वजन करूनच घेण्याचा िनयम आहे. ते शेगडीला जोडून देण्याचेही बंधनकारक आहे.
४.संबंधित कर्मचारी, वितरक तक्रार गांभीर्याने घेत नसतील तर तातडीने कंपनी अधिकाऱ्यांकडे संपर्क.
बातम्या आणखी आहेत...