आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप मेसेज... मी आत्महत्या करतोय, नंतर फोन बंद; दुसऱ्या दिवशी सापडला तरूणाचा मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शनिवारी सकाळी आईने सांगितलेल्या सर्व वस्तू किराणा दुकानातून त्याने आणून दिल्या. नाश्ता केला. नेहमीप्रमाणेच तो घराबाहेर पडला. दुपारी २.२७ वा. कुटुंबीयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज आला...मी टाकळी येथील पुलावरून नदीत उडी टाकून आत्महत्या करतोय. पुढच्या क्षणी घरच्यांनी त्याला फोन लावला तर फोन बंद. घरच्यांनी टाकळी परिसरात जाऊन शोधाशोध केली, मात्र तो सापडला नाही. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. 

प्रशांत जितेंद्र मुदगल (वय २०, रा. भारतरत्न इंदिरा नगर, सत्तर फूट रस्ता परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत शिवाजी रात्र महाविद्यालयात बारावीत शिकत होता. दहावीनंतर त्याने २०१२ मध्ये सिव्हिल डिप्लोमासाठी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. प्रथम वर्षाच्या काही विषयात तो अनुत्तीर्ण झाला. पुन्हा द्वितीय वर्षातल्या सर्वच विषयात तो अनुत्तीर्ण झाला. यानंतर तो नेहमी परीक्षा देत होता. घरातील सर्वजण त्याला प्रोत्साहन देत होते. मात्र तो उत्तीर्ण झाला नाही. शेवटी त्याने शिवाजी रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. आई गृहिणी तर वडील रिक्षा चालवतात. एक बहीण बी.एस्सी. द्वितीय वर्षात, तर दुसरी प्रथम वर्षात शिकत आहे. शनिवारी दुपारी आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबीयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठवला. यानंतर त्याने फोन बंद केला. कुटुंबीयांनी टाकळी परिसरात शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही. 
 
सोलापूर शनिवारीसकाळी आईने सांगितलेल्या सर्व वस्तू किराणा दुकानातून त्याने आणून दिल्या. नाश्ता केला. नेहमीप्रमाणेच तो घराबाहेर पडला. दुपारी २.२७ वा. कुटुंबीयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज आला...मी टाकळी येथील पुलावरून नदीत उडी टाकून आत्महत्या करतोय. पुढच्या क्षणी घरच्यांनी त्याला फोन लावला तर फोन बंद. घरच्यांनी टाकळी परिसरात जाऊन शोधाशोध केली, मात्र तो सापडला नाही. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. 

प्रशांत जितेंद्र मुदगल (वय २०, रा. भारतरत्न इंदिरा नगर, सत्तर फूट रस्ता परिसर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत शिवाजी रात्र महाविद्यालयात बारावीत शिकत होता. दहावीनंतर त्याने २०१२ मध्ये सिव्हिल डिप्लोमासाठी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. प्रथम वर्षाच्या काही विषयात तो अनुत्तीर्ण झाला. पुन्हा द्वितीय वर्षातल्या सर्वच विषयात तो अनुत्तीर्ण झाला. यानंतर तो नेहमी परीक्षा देत होता. घरातील सर्वजण त्याला प्रोत्साहन देत होते. मात्र तो उत्तीर्ण झाला नाही. शेवटी त्याने शिवाजी रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. आई गृहिणी तर वडील रिक्षा चालवतात. एक बहीण बी.एस्सी. द्वितीय वर्षात, तर दुसरी प्रथम वर्षात शिकत आहे. शनिवारी दुपारी आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबीयांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठवला. यानंतर त्याने फोन बंद केला. कुटुंबीयांनी टाकळी परिसरात शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही. 

व्हाॅट्सअॅपवरचा मेसेज 
‘मी,प्रशांत जितेंद्र मुदगल, टाकळी येथील पुलावरून उडी मारून नदीत आत्महत्या करत आहे. तरी माझ्या आत्महत्येस मी स्वत: जबाबदार आहे. त्यासाठी कोणालाही दोष देऊ नये, हीच माझी अंतिम इच्छा. आणि माझ्या परिवाराला सांभाळा, ही माझी कळकळीची विनंती. चला जातो...’ 
बातम्या आणखी आहेत...