आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ण मैदान यात्रेसाठी वापरण्याचा निर्णय, त्या रस्त्यावर अाता स्टाॅल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सिध्देश्वर यात्रेसाठी होम मैदानवरील रस्त्याच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर बुधवारी सायंकाळी मुंबईतील बैठकीत पडदा पडला.

राज्य सरकारने यंदा यात्रा जिल्हा प्रशासनाच्या आराखडा नियोजनाशिवाय भरवण्यासाठी निकाल दिल्याने पंच समितीच्या सिध्देश्वर भक्तांनी सोलापुरात जल्लोष केला. यात्रेच्या अापत्कालीन रस्त्यांसंदर्भात कलम २०८ नुसार उद्या नोटीफिकेशन निघेल. पोलीस अायुक्त अाणि महापालिका अायुक्त यांच्यावर अंमलबजावणीची जबाबदारी राहील. गुरूवारपासून होम मैदान स्टाॅलच्या उभारणीला सुरूवात होणार अाहे.

योजनाशिवाय सिद्धेश्वर यात्रा भरवण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. या घोषणेनंतर समितीने पाच दिवसांपासून सुरू असलेले चक्री उपोषण मागे घेतले.

यात्रेत सुविधा देण्याच्या प्रशासनाच्या आग्रहामुळे समिती आणि प्रशासन यांच्या वाद निर्माण झाला आहे. त्यावरून उपोषण सुरू होते. सकाळी १० वाजता उपोषणास सुरुवात झाली. दिवसभरात नगरसेवक जगदीश पाटील, अनिल पल्ली, सिद्धाराम चाकोते, बाळासाहेब भोगडे, चिदानंद वनारोटे, रेवणसिद्ध आवजे, केदार उंबरजे, गौरव जक्कापुरे आदींसह शिवभक्त उपस्थित होते. दिवसभरात प्रशासनाविरुद्धच्या घोषणा देण्यात आल्या. साेमवारी रोवलेला वासा आजही आंदोलनस्थळी दिसून आला नाही.

माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानेच सिध्देश्वर गड्डा यात्रेसाठी संपूर्ण होम मैदान वापरू देण्याचा निर्णय झाला. निर्णय सिध्देश्वर भक्तांसाठी यात्रेकरूंसाठी झाला अाहे. प्रणिती शिंदे, अामदार,शहर मध्य

लोकभावना लक्षात घेऊन निर्णय
सिध्देश्वर भक्तांचीलोकभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी िनर्णय घेतला अाहे. यात्रा वातावरण पाहूनच हा निर्णय झाला अाहे. हा तोडगा यापूर्वीच निघायला हवा होता. सुभाष देशमुख, अामदार,शहर दक्षिण

जनतेच्या भावनेची कदर केली
जनतेच्या भावनेचीकदर करून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. यात्रेला येण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. त्यांनी येण्याचे मान्य केले आहे.
विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

शहरातील कोणताहीरस्ता महापालिका अायुक्तांना विशेष बैठक घेऊन वापरण्यास देण्याचा अधिकार अाहे. कलम २०८ प्रमाणे महापालिका अायुक्त ठराव करतील. तो अधिकार त्यांना या कलमाप्रमाणे देण्यात आला आहे. ते लेखी सूचना काढून संबंधित यंत्रणांना ( पोलिस प्रशासन) माहिती देतील. अॅड. मिलिंद थोबडे