आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिवळे का झाले? अजूनही नाही उलगडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भीमा नदीच्या पात्रातील पाणी पिण्यायोग्य नाही, असे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक अारोग्य सेवा विभागाने स्पष्टपणे सांगितलेले असतानाही जिल्हा प्रशासनाला मात्र भीमा नदीतील हे पाणी अयोग्य का झाले?, पिवळे का झाले? याचा उलगडा करता अाला नाही. चारवेळा तपासण्या झाल्या पण त्याचे अहवालही गुलदस्त्यातच राहिले. अामदार प्रणिती शिंदे यांनी स्मरणपत्र दिल्यानंतरही प्रशासन अजून गप्पच राहिले अाहे. उजनी धरणातून सोलापूरला भीमानदीच्या पात्रातून अौज बंधा-याच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. डिसेंबर जानेवारीच्या सुरूवातीला पिवळे पाणी येत होेते. त्यावर नागरिकांमधूनही रोष निर्माण झाला होता.
जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी तर दीड दिवसात बैठकीत अहवाल सादर करा असे फर्मान काढले होते. पण जवळपास पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला पण अजुनही त्याचा उलगडा झाला नाही.
अामदारांच्या स्मरणपत्रा नंतरही नाही कारवाई : अामदार प्रणिती शिंदे यांनी दूषित पाण्याबाबत तपास करण्यासाठी पत्र दिले होते. त्यानंतर त्यांनी गेल्या अाठवड्यात जिल्हाधिका-यांना स्मरणपत्र धाडले. त्यानंतरही ‘अहवाल अप्राप्त’ अशीच उत्तरे मिळू लागली अहेत.

याठिकाणचे घेतले नमुने
अौजबंधारा, सोरेगाव, सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्र - २२ २३ डिसेंबर. टाकळी भीमा नदी पात्र - २६ डिसेंबर. पंढरपुर गुरसाळे बंधारा, गोपाळपूर, माचणूर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा, चिचपूर बंधारा, टाकळी पंपहाऊस - २७ डिसेंबर. चिचपूर बंधारा, पाणी उपसा केंद्र, सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्र, जुळे सोलापूर येथील पाणीपुरवठा करणारी टाकी - २८ डिसेंबर.

कमी अाॅक्सिजनमुळे मासे मेले
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या आैज (ता. दक्षिण सोलापूर) भीमा नदीपात्रातील बंधाऱ्यातील पाण्यात आॅक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे हजारो माशांचा मृत्यू झाला, असा अहवाल पुण्याच्या न्यायिक प्रयोगशाळाकडून (फॉरेस्निक लॅब) दोन दिवसांपूर्वीच आला. पाण्यात रासायनिक घटकांचा समावेश नसल्याचे त्या अहवाल नमूद अाहे. मस्त्य विकास केंद्राने केलेल्या तपासणीतही तोच निष्कर्ष असून त्या अहवालाच्या प्रती जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांना पाठविल्या अाहेत. मुंबई येथील प्रदूषण नियंत्रणमंडळाचे अधिकारी डॉ. प्रकाश मुंढे आयआयटी पवई येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्यांचा अहवाल आला नसून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात देण्यात येईल.” नवनाथ आवताडे, प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सोलापूर

नदीतील पाणी अयोग्यच
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक अारोग्य सेवा विभागाने भीमा नदीतील पाणी पिण्यायोग्य नाही असे स्पष्ट केले अाहे. २६ डिसेंबरला बंधाऱ्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. प्रती १०० मिलिलिटर पाण्यातील सूक्ष्मजंतूची संख्या कोलीफाॅर्म १६ धरमोटाॅलरंट १६ या प्रमाणात अाढळून अाली होती. त्यामुळे हे पाणी पिण्याअयोग्य अाहे हे स्पष्ट होऊनही ते तसे का झाले? याचा शोध घेण्यात प्रशासनाकडून चालढकल सुरू अाहे. अजून अहवाल अाला नाही हीच उत्तरे प्रशासनाकडून मिळू लागली अाहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेतली. त्यानंतरही तपासाला गती अालेली नाही. कोणावर कारवाई झालेली नाही.