आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wi Fi Service Bus Starts Between Mumbai To Hyderabad

वायफायची सेवा देणारी गाडी सुरू, मुंबई ते हैदराबाद व्हाया सोलापूर धावतेय 'अश्वमेध'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रवाशांची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून मोफत वायफाय सेवा देणारी अश्वमेध गाडी मुंबई- हैदराबाददरम्यान सुरू करण्यात आली आहे. सेमी लक्झरी असलेली ही गाडी व्हाया सोलापूर धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे.
दादर -पुणेनंतर मुंबई -हैदराबाददरम्यान सेवा सुरू केली आहे. महाराष्ट्रातील मोजक्याच शहरात अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. स्वीडन येथील कंपनीने ही गाडी बनवली आहे. सुमारे एक कोटी किंमत असलेल्या या अश्वमेध गाडीत आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

मुंबई-हैदराबादजाण्याची सोय
मुंबईवरूनदुपारी वाजता निघते.सोलापूरला रात्री वाजून ५५ मिनिटांनी पोहोचते. पाच मिनिटांचा थांबा घेऊन हैदराबादकडे रवाना होते. पहाटे तीन वाजता हैदराबादला पोहोचते. त्यानंतर हैदराबाद येथून पुन्हा दुपारी वाजता निघते. सोलापूरला सायंकाळी सात वाजता पोहोचते. त्यानंतर व्हाया पुणे ही गाडी मुंबईला पहाटे वाजता पोहोचते. गाडीस आरक्षणाची सुविधा असल्याने आरक्षित तिकिटासाठी १० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. प्रवाशांनी लाभ घ्यावा असे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
असे आहेत तिकीट दर
मुंबई -हैदराबाद १७३४ रुपये
मुंबई - सोलापूर ११०६ रुपये
सोलापूर -हैदराबाद ६२८ रुपये