आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको मुलांनंतर पुस्तकांवर जास्त प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - जुनी पुस्तके बघितली की अंगावर रोमांच येतो. जुने पुस्तके गाेळा करण्याचा छंदा संरक्षण सेवेतील नोकरी सोडल्यानंतर जडला. अनेक पुस्तके वाचली, परंतु त्या पुस्तकाचा जीवनात काहीतरी फायदा झाला पाहिजे या दृष्टीने पुस्तके गोळा करण्याचा छंद जोपासला. पुणे, मुंबई, दिल्ली येथून अनेक जुनी पुस्तके गोळा केली. बायको मुलांनंतर पुस्तकांवर जास्त प्रेम केले आहे, असे प्रतिपादन पुराभिलेख संशोधक आनंद कुंभार यांनी केले.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात माहिती जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आनंद कुंभार यांची संशोधन एक आनंदयात्रा या विषयावर मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यामुलाखतीला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुंभार बोलत होते.

कुंभार म्हणाले की अठराव्या शतकातील अनेक पुस्तके वाचनाच्या आवडीमुळे जमा केली होती. परंतु कालांतराने सर्व जुनी पुस्तके पुणे विद्यापीठाला देण्यात आली. ही पुस्तके पुणे विद्यापीठाने चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवली आहेत. त्यामुळे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या जुन्या पुस्तकांचा चांगलाच फायदा होत.

सन १८६७ च्या पूर्वीची कुठेच पुस्तके मिळत नाहीत, परंतु नंतरची पुस्तके कुठे ना कुठे नक्कीच मिळतात. ब्रिटिश सरकारने एखादे पुस्तक प्रकाशित केले तर त्याच्या दोन प्रती नामावंत ग्रंथालयांना देण्याची सोय केली होती.कुंभार यांची डॉ. सुहास पुजारी यांनी मुलाखत घेतली.
ग्रंथोत्सव २०१५-संशोधक-एक आनंदयात्रा यावर प्रकट मुलाखत झाली. संशोधक आनंद कुंभार यांच्याशी सुहास पुजारी यांनी केलेली बातचीत.

इतिहास सोलापूरचा
४५ वर्षांत फक्त दक्षिण उत्तर सोलापूर, मोहोळ अक्कलकोट तालुक्यांतील गावांमधील संशोधनद्वारे शिलालेख शोधले. उर्वरित तालुक्यात फिरता आले नाही. सोलापूरला इस ११३५ चा इतिहास आहे. पूर्वी सोलापूर कुकराम होते. मंद्रूप, मार्डी अणदूर ही गावे भरभराटीची होती. सिद्धरामेश्वर यांच्या जन्माने सोलापूरच्या वैभवात भर पडली. त्यांनी तलाव खोदला.त्यामुळे लोकवस्ती वाढण्यास सुरुवात झाली.