आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग १४ मध्ये वायफाय, डिजिटल लायब्ररी सेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका प्रभाग क्रमांक १४ मध्ये विविध विकासकामाचा शुभारंभ रविवारी करण्यात येणार आहे. त्यात मोफत इंटरनेटसाठी वायफाय, डिजिटल लायब्ररी आदींचा समावेश आहे, अशी माहिती नगरसेवक जगदीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी ११ वाजता तुळजापूर वेस येथील बसवेश्वर वाचनालय येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, शहर भाजपा अध्यक्ष अशोक निंबर्गी, विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रंगनाथ बंकापूर यांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्री वायफाय सेवा देण्यात येणार आहे. मधला मारुती, मंगळवार पेठ, बलिदान चौक, चाटीगल्ली, भुसारगल्ली, मीठगल्ली आदी भागात यांचा फायदा होणार आहे. विविध वृत्तपत्रे वाचता यावे म्हणून डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी elibrary.jagdishpatil.com या संकेतस्थळावर सुमारे ५० लाख पुस्तके वाचता येतील. गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी प्रभागात सीसीटिव्ही बसवण्यात येणार आहे. त्याची माहिती पोलिस कंट्रोल रूममध्ये दिसणार आहे. सराफ बाजारात कॅमेरा असणार आहे.

स्वच्छ प्रभाग
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रभागात शौचालय, डोअर टू डोअर कचरा उचलणे, झाडू कामगारांना गौरव करणे, डस्टबीन वापर करणे आदी सोयी असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...