आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामान्यांसाठी पाच लाखांचा विमा मंजूर करून घेणारच, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांची कुर्डुवाडीत ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - राज्यातील ज्या कुटुबांचे उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा घरातील कुटुंबप्रमुखांचा अपघाती, नैसर्गिक अशा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत विमा मिळावा यासाठी केंद्रातील बजेटमध्ये मंजुरी घेतल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

कुर्डुवाडी येथील भगवा झेंडा चौकामध्ये स्वाभिमानी रिपाइं आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत शेट्टी बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पूर्वी प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचे निश्चित केले आहे. जागा असो वा नसो त्यांना हक्काचे घर मिळणारच. नगरपरिषदेसाठी केंद्राच्या विविध योजनेचा निधी खेचून आणू. मात्र, यामध्ये कोणी चुका करत असतील तर त्यांच्या कानाला धरण्याची धमक आमच्यात आहे. मी राजकारणामध्ये आहे परंतु धंदेवाईक पुढारी नाही, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना करून राजकारणात उतरलो आहे. अलीकडे राजकारण हे भ्रष्ट झाल्याची कायम आेरड केली जाते. मात्र, राजकारणातील सुधारण्यासाठी सज्जन तरुणांनी या क्षेत्रात येण्याची गरज आहे. तरुणांच्या रिकाम्या हाताला काम देता येत नसेल तर राजकारण्यांनी त्यांना वाईट मार्गाला लावू नये, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...