आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या २४ तासांत ३२ ग्राहकांना वीजजोडणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नवीन वीज जोडणीसाठी सोलापुरातून अर्ज केलेल्या ३२ ग्राहकांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण करून केवळ २४ तासांमध्येच वीजजोडणी देण्यात आली. शहर विभागातील २३, अकलूूज विभागातील पंढरपूर विभागातील अशा एकूण ३२ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली. राज्यात इतर ठिकाणी अशाच प्रकारे वीजजोडणी देण्यात येत आहे. वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असलेल्या महावितरणने शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात ग्राहक सेवेचा नवा मानदंड निर्माण केला.
नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अंतर्गत प्रक्रिया करण्यात येते. यात आता मोबाइल अॅपचा समावेश झाला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची कार्यालयीन कार्यवाहीदेखील आता अॅपद्वारेच होत आहे. ग्राहकाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर लगेच नवीन वीजजोडणी अॅपद्वारे ग्राहकाच्या घरी तांत्रिक तपासणीची प्रक्रिया सुरू केली जाते. ही प्रक्रिया मोबाइल अॅपद्वारेच पूर्ण करून ग्राहकांना लगेच फर्म कोटेशन देण्यात येते. ग्राहकाने कोटेशन त्वरित भरणा केल्यास पुन्हा अॅपद्वारेच ग्राहकाच्या घरी मीटर लावून नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तसेच बिलिंग प्रणालीतही त्याची अॅपद्वारेच नोंदणी घेण्यात येऊन पुढील महिन्यापासून संबंधित ग्राहकांना देयक देण्यास प्रारंभ होतो. या आधुनिकतेचा लाभ घेत सोलापूर महावितरण कार्यालयाने सप्टेंबर रोजी उत्तम कामगिरी केली.

बारामती परिमंडलचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश कोळी, उपविभागीय अभियंता ए. डी. कांबळे, ए.वाय. कोंडगुळे, अकलूज विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावर, उपविभागीय अभियंता रवींद्र भुतडा, पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सानप, उपविभागीय अभियंता श्रीनिवास लिपारे, नंदकुमार सोनंदकर सहकाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली.

दुपारी वीज सुरूही
^सकाळी१०वाजता त्यांनी मेडशिंगी शाखा कार्यालयात अर्ज केला होता. सर्व्हे, कोटेशन आदी प्रक्रिया पूर्ण करून वाजेपर्यंत त्यांच्या घरी मीटर बसवून वीजपुरवठाही सुरू झाला. ते म्हणाले, ‘महावितरणच्या तत्पर सेवेमुळे कार्यालयात वारंवार चकरा मारणे प्रवासाला लागणाऱ्या खर्चाची बचत झाली.’ गुलाबसूर्यगंध, वाडेगाव, सांगोला

सकाळी अर्ज, दुपारी वीज
^शुक्रवारी सकाळीवाजता अर्ज केला. सर्व अर्ज भरून दिले. आवश्यक कागदपत्रांची यादी मला देण्यात आली. वाजता सर्व कागदपत्रे घेऊन गेलो. वाजता कोटेशन भरून दीड वाजता त्याची पावती सादर केली. महावितरणचे कर्मचारी वाजता आले आणि वीजजोडणी दिली. ही सर्व प्रक्रिया इतकी तत्पर झाली की पहिल्यांदा इतक्या जलद काम झाले.” इलाही शेख, वेळापूर माळशिरस, ग्राहक
बातम्या आणखी आहेत...