आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवाना स्टाॅलला अतिक्रमण समजणार, यात्रेसाठी पालिका फिरते शौचालय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होम मैदानावरील स्टाॅल उभारण्यासाठी पोलिस परवाना देणार असून, त्यासाठी महापालिका ना हरकत प्रमाणपत्र देईल. विनापरवाना स्टाॅल उभारल्यास ते अतिक्रमण समजून काढून टाकण्यात येतील. सुचवण्यात आलेल्या जागेवर स्टाॅल उभारण्यास परवागनी देण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाने यात्रेसाठी सूचना केल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे. यासाठी महापालिकेला पत्र देऊन जबाबदारी निश्चित केली. त्यानुसार काम करण्यात येणार आहे. त्यापूर्वी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, यात्रा समन्वयक निवासी उपजिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी महापालिकेत संबंधित विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला.

अग्निशामक दलाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा याबाबत सूचना केल्या. नियंत्रण कक्षात नऊ जणांची नियुक्ती केली. नंदीध्वज मार्गावर स्वच्छता, दिवाबत्ती, झाडांच्या फांद्या तोडणे, फिरते शौचालय, मोकाट जनावरांचा बंदोबस्त आदी कामे करण्याचे आदेश संबंधित विभागास दिले. स्वच्छतेसाठी सहायक आयुक्त प्रदीप साठे यांची नियुक्ती केली आहे. होम मैदानावरील खडी काढणे, आजोरा काढणे आदी कामे २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.

परवानगी घेऊन स्टाॅल, अन्यथा काढून टाकणार
होममैदानावर स्टाॅल उभारण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत महापालिकेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. पण या वर्षीपासून ते देण्यात येणार आहे. स्टाॅलधारकांनी महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर त्या अर्जावर तीन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. मनपाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पोलिसांकडून परवानगी घेऊन स्टाॅल उभारावा. अन्यथा स्टाॅल बेकायदेशीर आणि अतिक्रमण आहे, असे समजून काढून टाकण्यात येईल. रस्त्यावर स्टाॅल उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिका आयुक्त काळम-पाटील म्हणाले.

तीन बैठका
यात्रेसंबंधितमहापालिका यापुढे तीन बैठका घेणार आहे. १६ डिसेंबर, ११ जानेवारी अशा तीन बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...