आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुचाकीला धडक, नंतर हल्ल्यात दोघांचा खून; सोलापूरमध्‍ये रस्त्यावर थरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णा पाटील - Divya Marathi
कृष्णा पाटील

बार्शी-  अज्ञात हल्लेखोरांनी आधी एका छोटा हत्ती वाहनाने दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. नंतर चढवलेल्या सशस्त्र हल्ल्यात दुचाकीवरील तिघांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. दुहेरी खुनाची ही घटना बार्शी-ताडसौंदणे रस्त्यावर बाह्यवळण रस्त्याच्या पुढे शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. 


दुचाकीवरून कृष्णा मुरलीधर पाटील (वय ४०), माणिक कुंडलिक सातपुते (वय ६३) आणि सुदाम शंकर चव्हाण (वय ७०) हे बार्शीहून ताडसौंदणेकडे निघाले होते. का छोटा हत्ती वाहनातल्या अज्ञात लोकांनी आधी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. नंतर चढवलेल्या हल्ल्यात कृष्णा पाटील जागीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या सातपुते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चव्हाण यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत 


कृष्णा पाटील यांच्या डोक्यावर, पोटावर, पायावर सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले. कृष्णा पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडले. रक्तस्त्राव होऊन ते जागीच गतप्राण झाले. माणिक सातपुते सुदाम चव्हाण हेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. तिघांनाही बार्शीतील खासगी रुग्णालयात आणल्यानंतर कृष्णा पाटील यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या माणिक सातपुते यांचा उपचार सुरू असताना काही वेळातच मृत्यू झाला. सुदाम चव्हाण गंभीर जखमी आहेत. पांगरी पोलिसांत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 


ताडसौंदणेतपोलिस बंदोबस्त
पांगरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णालयात जखमीची विचारपूस केली. पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे, पांगरीचे सहायक पोलिस निरीक्षक ढोणे यांनी ताडसौंदणेत चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. 

 

वादाची पार्श्वभूमी 
अनेकवर्षांपासून ताडसौंदणेत दोन गटांत वैमनस्य आहे. नेहमीच हा वाद धुमसत असे. नुकताच दिवाळीमध्येही त्याचा प्रत्यय आला होता. कृष्णा पाटील त्यांच्या विरोधी गटाची दिवाळीतील रेड्यांच्या मिरवणुकीदरम्यान बार्शीतील पांडे चौकात किरकोळ हाणामारी झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...