आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोजवाड्यात लांडग्याचा 13 शेळ्यांवर हल्ला; दहा गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशी - तालुक्यातील गोजवाडा येथील एका शेळीपालक शेतकऱ्याच्या शेतातील शेडमध्ये बांधलेल्या १३ शेळ्यांवर लांडग्याने हल्ला करून लचके तोडले. यात तीन शेळ्या जागीच ठार झाल्या असून उर्वरित दहा जखमी शेळ्या गंभीर आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अशोक तोडकर शेतात शेळीपालन व्यवसाय करतात. रविवारी (दि.३) सकाळी शेळ्या शेडमध्ये बांधून ते घरी आले. त्यानंतर दोन तासानंतर साडे नऊच्या सुमारास त्यांचा मुलगा विशाल हा शेतात शेडवर गेला असता त्याला सर्व शेळ्या बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. यावेळी तीन शेळ्यांच्या गळ्यावर चावा घेऊन त्यांचा मृत्यू झाला होता.
 
यात एक बेण्याचे बोकड गाभण शेळ्याचा समावेश आहे. इतर शेळ्याच्या अंगावर, पायावर लांडग्याचे लचके तोडले होते. यात दहा शेळ्या गंभीर जखमी झाल्या असून दोन शेळ्या अंतिम घटका मोजत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...