आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा मिरवणुकीत दिसला महिलांचाही उत्साह, शांततेत पार पडल्या मिरवणुका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- यंदाच्या श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर महिलांचा उत्साह दणाणला. गल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सार्वजनिक मध्यवर्ती मंडळांच्या अधिपत्याखालील मिरवणुकीत सहभागी मंडळांची संख्या घटल्याने मिरवणुका लवकर संपल्याचे चित्र दिसून आले. मात्र, सार्वजनिक मंडळांची संख्या या वर्षी वाढली आहे.
 
दुपारी सव्वा एक वाजता सुरू झालेल्या मिरवणुका पहाटे साडेचार वाजता संपल्या. कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सिद्धेश्वर तलाव, संभाजी तलाव या दोन ठिकाणी बहुतेक मंडळांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन केले तर हिप्परगा तलाव येथे मिरवणूक काढता थेट विसर्जन करणाऱ्या मंडळांची सख्या लक्षणीय होती. 
 
लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची मिरवणूक मोठ्या उत्साहात शांततेत पार पडली. यंदाच्या वर्षी सहभागी मंडळांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेने कमी होती. तसेच नागरिकांनी देखील मिरवणूक पाहण्यापेक्षा घरात राहणेच पसंत केल्याने मंडळाच्या मिरवणुकीच्या दुतर्फा असणारी गर्दी यंदा पाहण्यास मिळाली नाही. लोकमान्यच्या मिरवणुकीत सुमारे २० ते २५ मंडळांनी सहभाग घेतला खरा. मात्र यात १० मंडळे मोठी होती. उर्वरित १५ मंडळे छोटी होती. मागच्या वर्षी जवळपास ४५ ते ४७ मंडळांनी सहभाग घेतला होता. यंदा ही संख्या निम्म्यावर आली. 
बातम्या आणखी आहेत...