आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी मीना बाजारमध्ये महिलांची लगबग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बाजारम्हटले की, त्यामध्ये महिलांची सौंदर्य प्रसाधने आलीच. रमजाननिमित्त लागलेल्या मीना बाजारमध्ये सौंदर्य प्रसाधने खरेदीकरिता महिलांची लगबग सुरू झाली आहे. यात बांगड्या, बेंटेक्स, मेंदीसह सौंदर्य प्रसाधनांची अनेक दुकाने लागली आहेत. सध्या बाजारात सुपर, स्टार, ममता आदी मेंदी कोन आले असून, दहा ते पंधरा रुपयांपर्यंत हे मिळत आहेत.

बांगड्यांमध्ये हैदराबादी बांगड्यांची जास्त मागणी असून, कंकर गोट, कुंदन गोट, मोती गोट, काचेच्या बांगड्या, फॅन्सी बांगड्या, मेटल बांगड्या आल्या आहेत. हे ४० रुपयांपासून २०० रुपये याची किंमत आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी ही कंकर गोट आणि मोती गोटला आहे. बेंटेक्सच्या साहित्यामध्ये मोती हार सेट, केंकर हार सेट, टॉप्स, एअर रिंग, अंगठी, गोल्डन बांगड्य आदी अनेक प्रकारचे साहित्य बाजारात असून, हे १०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत आहेत. त्याशिवाय बो, स्पेलिंग चैन, पीन, काटा, साडी पीन आदी अनेक प्रकारचे साहित्य प्रत्येकी १० रुपयांत विकणाऱ्या स्टॉलचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण या मीना बाजाराचा आनंद घेत आहेत.

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून येथे सौंदर्य प्रसाधनांचे स्टॉल लावतो. आमच्याकडे १० ते २००० रुपयांपर्यंतचे अनेक साहित्य आहेत. प्रारंभी फक्त सायंकाळीच ग्राहकांची गर्दी असायची. आता दुपारी १२ नंतर रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहकांची गर्दी आहे.'' सलिमशेख, व्यापारी