आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बंटी बबली’ स्टाइलने हिसकावले मंगळसूत्र ,पोलिसांना चोरट्यांचा अजूनही नाही सुगावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘बंटी आणि बबली’ या चित्रपटातील कथेला साजेसा चोरीचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडल्याने पोलिसांसमोर नवे अाव्हान उभे अाहे. अाठवड्यात महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरण्याची ही तिसरी घटना. या घटनेत विजापूर रोडवरील मीरानगर येथे चक्क महिला पुरुष अशा दुचाकीस्वारांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेल्याने पोलिस चक्रावले अाहेत. चोरट्यांचा सुगावा लागला.
 
नीलम पोळ (वय २७,रा. आर्य चाणक्य नगर, विजापूर रोड) या आपल्या वर्षाच्या मुलास ट्यूशनवरून घराकडे घेऊन जात होत्या. यावेळी अचानक पाठीमागून स्प्लेंडर या गाडीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गाडीला कट मारला. पोळ यांचा तोल जाताच त्यांच्या गळ्यातील तब्बल २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसका मारून चोरटे पसार झाले. दुचाकी चालवणारा पुरुष तर त्याच्यामागे २५ ते २७ वयोगटातील मोकळे केस सोडलेली तरुणी बसलेली होती, असे पोळ यांनी सांगितले. चालकाने पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. 
 
वेळीच संपर्क करावा 
- ही घटना घडल्यावर तब्बल पाऊण तासाने पोलिसांना समजले. नागरिकांनी सतर्क रहाणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुषाने एकत्र चोरीचा पहिलाच प्रकार आहे. नागरिकांनी मदतीसाठी तातडीने १०० क्रमांकावरून मदत घ्यावी.'' श्री.भोसले, सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी 
बातम्या आणखी आहेत...