आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी व्हायचं स्वप्न अपूर्णच, साेलापुरात महिला पाेलिसाचा अपघातात मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हसतमुख चेहरा, मनमिळाऊ स्वभाव, तीनच वर्षांपूर्वी मोठ्या जिद्दीने पोलिस दलात सामील झाली. अधिकारी होण्याची जिद्द उरी बाळगून स्पर्धा परीक्षेची जय्यत तयारी करणाऱ्या महिला पाेलिसावर मंगळवारी काळाने घाला घातला. सुटी घेऊन दुचाकीवर गावी निघालेल्या अपर्णाला चारचाकीने जाेराची धडक दिली, यात तिचा मृत्यू झाला. अपर्णा अण्णासाहेब जाधव (वय २४) असे मृत महिला पाेलिसाचे नाव अाहे. मंगळवारी सुटी घेऊन त्या गावी जात हाेत्या. वडवळजवळील कळमण कवठाळी येथे त्यांचे घर आहे. मात्र, एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात अपर्णा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या पाेलिस सहकाऱ्यांच्या डाेळ्यात अश्रू तरळले. मृतदेह शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या सखींनी हंबरडा फोडला. ‘अप्पीचे अधिकारी हाेण्याचे स्वप्न अपुरेच राहिले,’ असे त्यांच्या रूममेट दीपाली बाेरामणीकर म्हणाल्या.