आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहाच्या कपाने बांधले स्वप्नांचे इमले, हिमतीने रेटला संसाराचा गाडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - चहाच्या एका एका कपाच्या हिशेब मांडत सिद्धेश्वर पेठेतील संगमनाथ टी हाऊसच्या संचालिका सरोजिनी वाले यांनी पाचही मुलांना शिक्षण देऊन पायावर उभे केलेे. एका कन्येला डीएड तर एका मुलाला सॉफ्टवेअर इंजिनिअर केले आहे. बाकीच्या तिन्ही मुलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
२० वर्षांपूर्वी एनजी मिल बंद होणार असे कळल्यानंतर सरोजिनी यांचे पती गुरुबसप्पा यांनी चिंता व्यक्त केली. सरोजनी यांनी एक कॅन्टीन सुरू करण्याची संकल्पना व्यक्त केली. तुम्ही मिलचे काम पाहा, कँटीन मी पाहीन असे सांगत विश्वास दिला. सिध्देश्वर मंदिराच्या समोर छोटेसे खोके टाकून कँटीन सुरू केले. चिकाटीने गिऱ्हाईक वाढविले. त्याने संसाराचा गाडा हाकण्यास मोठी मदत झाली. मुले, मुलींचा संसार आनंदाने सुरू झाला. २० वर्षे सतत प्रवास करणाऱ्या अप्पांची साथ अचानक देवाने राेखली आणि सरोजिनी ताईंवर सगळी जबाबदारी आली. तरीही त्या खचल्या नाहीत.

नूरजहाँ शेख सरोजिनी वाले
सोलापूर उपाशीराहिले. मुलांनाही एकवेळचे जेवण देण्यास काही नसायचे. तरीही हरले नाही की खचले नाही. आधी पेपर स्टॉल, मग पंक्चरचे दुकान, पुढे कँटीन असा प्रवास करत मुलांना शिक्षण दिले. असे सांगत नूरजहाँ शेख चाचींच्या डोळ्यात अासवांचे आभाळ जमले. जुळे सोलापूरच्या गोविंदश्री मंगलकार्यालयासमाेर १० वर्षे एका छोट्या टपरीत त्यांनी कँटीन मांडले आहे. त्याच्या बळावर दोन मुलींना एमबीए करून सक्षम केले. मोठी मुलगी तबस्सुम ‘महावितरण’मध्ये कनिष्ठ लिपीक आहे. छोटी मुलगी ही पुण्याच्या ‘एनएस बी’ कंपनीत काम करते. मुलगा इब्राहिम याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले तर छोटी मुलगी परवीन ही शिकत आहे. कामगार यासीन शेख यांच्या एनजी मिल बंद पडण्याआधीपासून कष्ट उपसण्याचे प्रचंड काम केले. मात्र त्यांच्या नशिबी सदैव कष्ट होते. आजही त्यांनी शांत बसता कँटीन सुरू ठेवले आहे.
बातम्या आणखी आहेत...