आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठी महिला, शाळकरी मुले रस्त्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मागणी करूनही सिंगल फेज वीज मिळत नाही म्हणून होनमुर्गीच्या बसवेश्वर नगरमधील महिला शाळकरी मुलांनी निषेध नोंदवत गुरुवारी सोलापूर- विजयपूर महामार्गावरील तेरामैल येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महिलांनी रक्कम भरूनही वीज प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधी प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष डाॅ. शिवानंद झळके म्हणाले, होनमुर्गीच्या बसवेश्वर नगरमध्ये शंभर घरे आहेत. सिंगल फेज विजेसाठी रितसर कोटेशन भरले आहे. पण गेल्या चार वर्षात वीज मिळाली नाही. यामुळे ही कुटुंबे आजही अंधारात आहेत. 

होनमुर्गी गावाने भाजपला साथ दिली. पण सहकारमंत्र्यांना इतक्या वर्षांत हा प्रश्न सोडवता आला नाही. तालुका विकासाचे माॅडेल करू, असे सहकारमंत्री वारंवार सांगतात. पण येथे महिला मुलांना विजेसाठी रत्यावर उतरावे लागते. शेतकऱ्यांना वेळेवर ट्रान्सफाॅर्मर मिळत नाही ही शोकांतिका आहे. होनमुर्गीचा विजेचा प्रश्न सुटत नसेल तर सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. जर हा प्रश्न आठ दिवसात नाही सोडवल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. 

यावेळी श्रीमंत डोमनाळे, शकुंतला रबनाळे, विद्यार्थिनी भाग्यश्री नाटेकर यांनी वीज नसल्याने होणारा त्रास सांगितला. वीजवितरण कंपनीचे अधिकारी सैफन शेख यांना निवेदन दिले. त्यांनी हा प्रश्न लवकर सोडवण्याचे आश्वासन दिल्यांतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महंमद शेख, इंदुमती नाटीकर, महादेवी पुजारी, शालन पांढरे, बसाव्वा हसापुरे, राजकुमार देशमुख जावेद आवटे सहभागी झाले होते. 

सहकारमंत्र्यांना सांगूनही प्रश्न नाही सुटला 
बसवेश्वरनगरात सिंगल फेज वीज नाही. कोटेशन वीजबील भरूनही काम होत नाही. सहकारमंत्री देशमुखांना सांगूनही हा प्रश्न सुटत नाही तर उपयोग काय. त्यांना पुन्हा निवडून यायचे नाही का, असा प्रश्न करून बसण्णा नरसगोंडे यांनी संताप व्यक्त केला. या आंदोलनात पुरुषांबरोबर महिला मुलांसह सहभागी झाल्या होत्या. 
बातम्या आणखी आहेत...