आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेता अन् आयुक्तांमध्ये खडाजंगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकाविरोधी पक्षनेते नरेंद्र काळे आणि आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्यात सोमवारी सायंकाळी खडाजंगी झाली. आयुक्तांनी काळे यांच्यावर ब्लॅकमेल करण्याचा आरोप लावला. तर आयुक्त उद्धट बोलल्याचा आक्षेप काळे यांनी घेतला. बोगस नंबरप्लेट असलेल्या जीपच्या चौकशीविषयी विचारणा करण्यास काळे आयुक्तांच्या कक्षात गेले होते. त्यावेळी हा प्रकार सर्वांसमोर घडला. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून नगरसेवक सुरेश पाटील, इंदिरा कुडक्याल यांनी मध्यस्थी केली. नंतर काळे यांना घेऊन ते बाहेर पडले.
आयुक्तांना परगावी जाण्यास विनायक ट्रॅव्हल्सकडून जीप भाड्याने घेतली होती. आयुक्त स्मार्ट सिटीच्या बैठकीला त्यातून गेले होते. त्या गाडीची नंबरप्लेट बोगस असल्याचे निदर्शनाला आले. त्याची चौकशी उपायुक्त श्रीकांत म्याकलवार करत असून त्याला महिना लोटला आहे. त्यामुळे त्याची विचारणा करत लेखी निवेदन देण्यास काळे आले होते.

आयुक्त म्हणाले, “अहवाल आल्यावर कारवाई करतो. त्यावर चौकशी कधी होईल? असा प्रश्न काळे यांनी केला. म्याकलवार चौकशी करत आहेत. त्यांना विचारा, असे आयुक्तांनी सूचवले. त्यावर आक्षेप घेत काळे म्हणाले आम्ही तुम्हाला विचारणार. त्यांना तुम्ही विचारा. त्यानंतर वाद वाढून आवाजही वाढला.

मला ब्लॅकमेलिंग करू नका? हे खपवून घेणार नाही. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून स्मार्ट सिटी आणली, असे आयुक्त म्हणाले. ब्लॅकमेलिंग कोणाला म्हणाला म्हणताय? मी खंबीर अाहे, असे काळे म्हणाले. नगरसेवक पाटील यांनी आयुक्तांना शांत केले. तर कुडक्याल यांनी काळे यांना शांत केले.
बातम्या आणखी आहेत...