आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधान मिळेपर्यंत काम करतो अन् लोकांना ते आवडते - नागराज मंजुळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माझ्या कोणत्याही चित्रपटाचा विषय सामाजिकच असतो. पिस्तुल्या, फँड्री, सैराट किंवा इतर चित्रपट हे आपल्या समाजाचे प्रतिबिंबच आहेत. मला जोपर्यंत समाधान मिळत नाही तोपर्यंत मी काम करत राहतो आणि ते लोकांना आवडते. याचा आनंद मोठा आहे, अशी भावना सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी प्रसिद्ध संगीतकार अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अरबाज शेख, छाया कदम, निखिल साने हे उपस्थित होते.

आपल्या चित्रपटांसाठी पात्रांची निवड करताना अभिनयाचा गंधही नसलेल्या नवख्यांना आपण संधी देता. तसे करणे आव्हान वाटते का, या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले, 'नव्या कलावंतांसोबत काम करताना मोकळेपणा असतो. बनचुके लोक अॅक्शन म्हणायचीही वाट पाहत नसतात. ते तयारच असतात. त्यामुळे काही वेगळे करायचे असल्यास त्याला बंधने येतात.'

कोणी काय म्हटलं...

आपण जेऊरला कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी नागराज मंजुळे यांचे भाऊ यांनी आपल्याला पाहून ऑडिशनला येण्यास सांगितले. त्यातून निवड झाली आणि एका सज्जन मुलाचा रोल करण्याची संधी मिळाली आहे. पुढेही कलाकृती साकारण्याचे काम सुरू असणार आहे. अाकाश ठोसर, अभिनेता
चित्रपटाच्या ऑडिशननेआपण निवडले गेलो. काहीही येत नसताना या निमित्ताने बुलेट, ट्रॅक्टर, घोडा याचा आनंद घेण्याचा अनुभव मिळाला. रिंकू राजगुरू, अभिनेत्री
उत्तम कलाकृतीचीनिर्मिती करताना पैशाचा विचार करता काम करतो. त्याचे वेगळे समाधान वेगळे मिळते. निखिल साने, निर्माता
सैराटचे संगीत म्हणजे आजवर केलेल्या संगीताच्या प्रवासाला छेद देणारे काम आहे. कारण हे काम करताना कथेचे, काळाचे असे काहीही बंधन नव्हते. त्यामुळे सैराटने आपल्याला खूप काही दिले. अतुल, संगीतकार