आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार नेते आडम यांची मुख्यमंत्र्यांशी भेट; CM म्हणाले, कामगारांवर अन्याय नाही, बैठक लवकरच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंत्रमागकामगार भविष्य निर्वाह निधीसंदर्भात सोलापुरात सुरू असलेला संघर्ष ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत सांगितला. त्यावर श्री. फडवणीस म्हणाले, “कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही. २५ ऑक्टोबरनंतर सर्वांना बोलावतो. निश्चित तोडगा काढू. 
 
येत्या बुधवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू साेलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते कामगारांच्या घरकुलांचे भूमिपूजन आयोजित केले अाहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी श्री. आडम यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. २० मिनिटांच्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर ऐकून घेतले. त्यानंतर कारखानदार, भविष्य निर्वाह निधी आयुक्त, कामगार संघटना या सर्वांना बोलावतो. होणाऱ्या चर्चेत कामगारांवर अन्याय होणार नाही. त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, या दृष्टीने निर्णय घेऊ, असे म्हणाल्याचे आडम यांनी सांगितले. 

तिरपुडेंच्या विरोधात अनेक तक्रारी 
दरम्यान,श्री. आडम यांनी केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांची दिल्लीत भेट घेतली. सोलापूर विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांच्या धडाकेबाज भूमिकेमुळेच कामगारांत हक्काची जाणीव झाली. सर्व कामगार एक होऊन रस्त्यावर उतरले. ही स्थिती पाहून कारखानदार त्यांच्या बदलीची भाषा करतात. कुठल्याही स्थितीत डॉ. तिरपुडे यांची बदली होता कामा नये, अशी विनवणी आडम यांनी केली. त्यावर गंगवार म्हणाले, “तिरपुडेंच्या विरोधात तर लोकप्रतिनिधींसह अनेकांच्या तक्रारी आल्या.” 
 
रास्तारोको ७० जणांची धरपकड 
कामगारसंघटना कृती समितीने गुरुवारी सकाळी अक्कलकोट रस्ता एमआयडीसी पाेस्ट कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत श्री. आडम यांच्यासह ७० कामगारांची धरपकड केली. सायंकाळी सुटकाही केली. दिवाळी सुरू झाली तरी कारखानदार उत्पादन सुरू करत नाहीत. दुसरीकडे त्यांना भोजन देतात. आयुष्यभर पिळवणूक करून दोन दिवस दोन घास दिले की, झाले काय? त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाचे उत्तर (भविष्य निर्वाह निधी) कुठाय? असा प्रश्न त्यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...