आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन ठप्प, बँका बंद अन् निघाले कामगारांचे मोर्चे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्र आणि राज्याच्या कामगारसंबंधी धोरणांना विरोध करण्यासाठी शुक्रवारी देशव्यापी संपाची हाक देण्यात अाली होती. त्याला सोलापुरातून मोठा प्रतिसाद मिळाला. आैद्योगिक उत्पादन ठप्प झाले होते. राष्ट्रीयीकृत बँका बंद होत्या. शहराच्या चारही दिशांनी आंदोलकांचे जथ्थे निघाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आंदोलक एकवटले आणि सरकारविरोधी घाेषणा दिल्या.
कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने या संपाची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत सरकारी कर्मचारी, बँक, विमा, आरोग्य, शिक्षण आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी मोर्चे काढले. दत्तनगर येथून ‘सीटू’चा मोर्चा निघाला. चार पुतळ्यापासून सरकारी कर्मचारी निघाले. सिद्धेश्वर पेठेतून जनरल कामगार युनियनच्या सदस्यांनी झेंडे घेतले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जुना एम्प्लॉयमेंट चौकात निदर्शने केली. शासकीय रुग्णालयात परिचारिकांनी द्वारसभा घेऊन घोषणा दिल्या. लाल साडी नसलेल्या अंगणवाडी सेविकांनीही घोषणा देत असंतोष व्यक्त केला.
महसूल प्रशासनाचे ७० कर्मचारी कार्यालयात कामावर होते. यामध्ये गट वर्गाचे १५, गट वर्गाचे ३७ तर गट वर्गाचे १८ अशा एकूण ७० जणांनी सेवा बजावली तर गैरहजर होते. याचा अहवाल महसूल प्रशासनाने शासनास कळवला आहे.

या आहेत मागण्या
{किमानवेतन दरमहा १८ हजार रुपये करा
{ जुनी पेन्शन (२००५ पूर्वी) योजना लागू करा
{कामगार कायद्यातील बदल त्वरित रद्द करा
{साठी गाठलेल्या शेतकऱ्यांना पेन्शन द्या
{अंगणवाडी, आशा वर्कर्सना किमान वेतन द्या
{राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण रद्द करा
{ग्रामीण डाकसेवकांना शासकीय सेवेचा दर्जा द्या
{यंत्रमाग, विडी कामगारांना किमान वेतन लागू करा
{नव्या वाहतूक कायद्यातील जाचक अटी रद्द करा
{रेशनव्यवस्था मजबूत करून जीवनाश्यक वस्तू द्या

सभेत झाले रूपांतर
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पूनम गेट येथे सीटूचे प्रदेशाध्यक्ष नरसय्या आडम, सचिव अॅड. एम. एच. शेख, कृती समितीचे निमंत्रक अशोक इंदापुरे, लेबर पार्टीचे साथी बशीर अहमद, महापालिका कामगार संघटनेचे अशोक जानराव यांनी या वेळी केंद्र आणि राज्याच्या कामगारसंबंधी धोरणांचा खरपूस समाचार घेतला. कामगारांना असुरक्षित करण्याचा डाव हाणून पाडा, असे अावाहन केले.

आडम यांची प्रकृती बिघडली
सर्व अांदोलक पूनम गेटजवळ आल्यानंतर सरकारविरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर श्री. आडम यांचे भाषण सुरू झाले. परंतु त्यांच्या बोलण्यात नेहमीसारखा जोश नव्हता. काही मिनिटांतच ते मटकन् खाली बसले. रक्तातील साखर कमी झाल्याने असे झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना उपचारासाठी नेले.

१०० टक्के सहभाग
महसूल विभागातील सर्व कामगार संघटनांनी संपात सहभागी होत १०० प्रतिसाद दिला. हजार ६९६ कर्मचारी संपावर गेले होते. प्रांताधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना, सामान्य शाखा, जिल्हा पुरवठा कार्यालय, सेतू, ग्रामपंचायत कार्यालये रिकामी होती. अनेक कार्यालयांमध्ये कामकाज बंद असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी परतीचा मार्ग धरला होता.
बातम्या आणखी आहेत...