आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजुरांच्या हेराफेरीमुळे सुविधांवर ताण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात स्वच्छता आणि नागरी सुविधा पुरवण्याचे काम चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे असते. परंतु कोणता कर्मचारी कुठे कार्यरत आहे, याचा थांगपत्ता मनपा प्रशासन विभागाला नाही. नेमणूक एकीकडे काम दुसरीकडे हा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. शिपाई लिपिकांचे काम करतोय, मुकादम हेडक्लार्कची जबाबदारी संभाळत आहे. उद्यान विभागातील कर्मचारी चावीवाले म्हणून काम करतात. लोकप्रतिनिधींची कर्मचारी नेमणुकीत ढवळाढवळ वाढली आहे. मनपा प्रशासन विभागाला पत्र देऊन मर्जीतील कर्मचाऱ्यांची पळवापळवी होत असल्याने शहरातील नागरी सुविधांवर परिणाम होत आहे. "डीबी स्टार' ने या विषयावर घेतलेला आढावा.
शहरातील दहा लाख लोकांपर्यंत नागरी सुविधा पोहोचवण्याचे काम मनपा प्रशासन करते. कचरा, स्वच्छता याचे प्रश्न उग्र बनत असताना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अडचणी येतात,असे मनपा प्रशासन सांगते, तर दुसरीकडे नागरी सुविधा पुरविणारे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी काम करता दुसरीकडे काम करता वेळ घालवताना दिसतात. लोकप्रतिनिधींची मेहेरनजर असल्याने त्यांच्यावर कारवाईही होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधीही हेच कर्मचारी पाहिजेत म्हणून आग्रह धरतात. खुद्द महापौर यांनी मनपा सामन्य प्रशासन विभागाला पत्र देऊन कर्मचाऱ्यांची शिफारस केल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत नगरसेवक प्रा. अशोक निंबर्गी यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.

आरोग्य विभागात गोंधळ मनपाकर्मचाऱ्यांची नेमणूक एकीकडे तर काम दुसऱ्या ठिकाणी असा प्रकार पाहायला मिळतो. त्यामुळे कर्मचारी नक्की काय काम करतो तेच समजत नाही. विभाग प्रमुखांचा दाखल आणणे वेतन घेणे असे प्रकार दिसून येतात. सर्वात जास्त गोंधळ आरोग्य विभाग नगरसचिव कार्यालयात आहे.

सफाई कामावर परिणाम चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पळवापळवीमुळे शहरातील ड्रेनेज लाइन स्वच्छता, रस्ते सफाई, आरोग्य, खड्डा दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती, झाडाच्या फांद्या तोडणे, आपत्कालीन कामे, कचरा निर्मूलन आदी कामांवर परिणाम हाेत आहे.

ओरड कायम : तीनहजार कर्मचारी असताना शहरात स्वच्छता राखली जात नाही. इतर नागरी सुविधा वेळेवर िदल्या जात नाहीत. झोन कार्यालयास अपुरी यंत्रणा असल्याने त्यांच्याकडून कामे होत नाहीत.

कार्यालयात मजूर नियुक्ती
महापालिकानगर सचिव विभागात मजुराची आवश्यकता नसताना तेथे मजुराची नियुक्ती केली. महापौर निवास, उपमहापौर सभागृह नेता कार्यालयात शिपाई म्हणून मजूर काम करतात. नगरसचिव कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा ऐच्छिक निधी खर्चाचा हिशेब तेच हाताळतात. मनपा पदाधिकारी, नगरसेवक अधिकाऱ्यांकडून मर्जीतील मजुरांची नेमणूक केली जात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या विभागात ताण आढळतो.

८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती एका ठिकाणी, तर दुसऱ्या ठिकाणी काम असा प्रकार आहे.
याबाबत आरोग्य सभापती राजकुमार हंचाटे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले.
अमिता दगडे पाटील सहाय्यकआयुक्त
Áनावासह कर्मचारीमागता येतो का?
Àनाही,पण त्यांना कामाच्या सोयीसाठी मागितले असेल.
Áमजूरशिफाई पदावर कसे?
Àशिपाईकमी असल्याने मजुरांना ती कामे दिली
Áनागरीकामावर परिणाम होत नाही का?
Àहोतअसेल तर त्यांच्या मागणीनुसार कर्मचारी दिले जातात.
Áकामएका ठिकाणी वेतन दुसरीकडे कसे?
Àहाप्रकार संबंधित कार्यालयामार्फत होतो. याबाबत परिपत्रक काढू. यापूर्वी तसे परिपत्रक काढले हाेते पण अमंलबजावणी नाही.

नावाने मागणी कशी
महापौर निवासस्थानी काम करण्यासाठी मजुरांच्या नावाने मागणी करण्यात आली आहे. त्यांना कर्मचारी मिळण्याशी मतलब हेच कर्मचारी पाहिजे असा आग्रह कशाला केला जातो. याबाबत मनपा प्रशासनाकडे जाब विचारला अाहे. प्रा.अशोक निंबर्गी, भाजप नगरसेवक

पत्रदेऊन दखल नाही
अारोग्य विभागात कामाच्या ठिकाणी काम करता नुसता दाखला आणून पगार काढला जातो. याबाबत मी आरोग्य अधिकाऱ्यांना तीनवेळा पत्र देऊन मूळ िनयुक्तीच्या ठिकाणी कर्मचारी पाठवा अशी मागणी केली, पण कारवाई काही झाली नाही. राजकुमारहंचाटे, सभापती, आरोग्य समिती

हप्तेबाजीचा संशय
एप्रिल१९९५ नंतरची भरती बेकायदेशीर आहे. नेमणुकीच्या ठिकाणी कर्मचाऱ्याने काम केले पाहिजे. राजकीय नेत्यांच्या वशिल्याने नेमणूक केली जाते. एका ठिकाणी नियुक्ती आणि दुसऱ्या ठिकाणी काम यात हप्तेबाजी होण्याची शक्यता आहे. अशोकजानराव, मनपा कामगार कृती संघटना

आवश्यकते नुसार नेमणूक
एखाद्या विभागात आवश्यक पद नसल्यास इतर कर्मचाऱ्यांकडे काम दिले जाते. त्यानुसार नेमणूक केली जाते. आरोग्य विभागात ८० कर्मचारी असतील असे वाटत नाही. मूळ ठिकाणी पाहावे लागतील. आवश्यकतेनुसार नेमणूक केली आहे. डाॅ.जयंती आडकी, मनपा आरोग्य अधिकारी

रुग्ण नाहीत, पण १४ जणांची नियुक्ती
एकीकडे कर्मचारी नाही म्हणून नागरी सुविधांवर परिणात होताे, अशी ओरड केेली जाते, तर काही ठिकाणी गरज नसताना भरमसाट कर्मचाऱ्यांची नेमणूक दिसून येते. मनपाच्या साबळे प्रसूतीगृहात रुग्ण नाहीत, तेथे १४ जणांची नियुक्ती आहे.

परिवहन विभागाचे चालक मनपाकडे
परिवहनविभागाकडील चालक मनपाकडे वर्ग केल्याने त्यांना चालकांची कमतरता भासत आहे. त्यामुळे नव्याने चालक भरती करण्याची वेळ आली आहे. परिवहन विभागाकडील कर्मचारी मनपाकडे पळवण्यात आले आहेत.

नावे सुचवली नाहीत
मीनाव सुचवले नाही, पण कामासाठी दोन कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. आलेले कर्मचारी कोण आहेत ते मी पाहिले पण नाही. त्यामुळे त्यात माझा संबंध नाही. सुशीला आबुटे, महापौर
मजूर ८७४
झाडूवाले ५६५
सफाई कामगार ४४१
बिगारी ३९२
शिपाई, चौकीदार २७९
जमादार १०३
चावीवाला ७८
आया ५६
मुकादम ५३
क्षेत्र कार्यकर्ता ४६
फायरमन ३१
लॅम्प लायटर २९
रखवालदार २४
माळी १८
फिमेल अंटेडट १४
ड्रेसर १२
फवारणीवाला ०८
लॅम्प मदतनीस ०८
सुरक्षा रक्षक ०७
बायंडर ०३
हवालदार ०१
लिफ्टमन ०१ (मनपात दोन लिफ्ट आहेत)
एकूण ३०४३
४४२ रिक्त पदे
३४८५ एकूण पदे

मनपाकडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संख्या
३०४३ प्रत्यक्ष कार्यरत
६० कर्मचाऱ्यांवर प्रत्यक्षात येथील कामकाज चालते (साप्ताहिक सुटी, हक्क रजा, वैद्यकीय रजा वगळता).
जण फक्त उपलब्ध मुख्य कार्यालयात असतात.
२२० कर्मचारी असून उद्यान विभागात त्यापैकी १०० कर्मचारी इतर खात्यांत वर्ग केले आहेत.
३०० कर्मचारी उद्यान विभागाच्या अस्थापनेवर आवश्यक आहे.