आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर बस स्थानकावरील फलाटांची संख्या वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर बस स्थानकाच्या (एसटी स्टंॅड) आवारात असलेल्या वर्कशॉप गाड्यांचे भंगार दुसरीकडे हलवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. एसटी प्रशासनाने एमआयडीसी चिंचोळी येथे सुमारे २५ एकर जागा घेतली आहे. या ठिकाणी नवीन वर्कशॉप बांधण्यात येणार अाहे. भंगारातील गाड्या ठेवण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील बस स्थानकावर पुरेशी जागा उपलब्ध होणार अाहे. त्या जागेवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी फलाट आणि प्रवाशी सुविधा देण्यात येणार आहे. सध्या वर्कशॉपची डिझाइन बनवण्याचे काम सुरू आहे.
सोलापूर बसस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरात जवळपास हजारांहून अधिक गाड्या बसस्थानकावर येतात आणि जातात. याचा विचार करता सोलापूर बसस्थानक अपुरे पडत आहे. सोलापूर बसस्थानकाची जागा सुमारे एकर इतकी आहे. एमआयडीसी चिंचोळी येथे घेतलेल्या जागेत दोन टप्प्यात नव्या वर्कशॉपचे काम केले जाणार आहे.

वर्कशॉप स्थलांतर केल्याने प्रामुख्याने तीन फायदे होणार आहेत. एक - स्थलांतर झाल्यावर त्या जागेत प्रवाशी सुविधा अतिरिक्त फलाट उभारले जातील. दोन - गाड्यांना दुरुस्तीसाठी सोलापूरला यावे लागणार नाही. त्यामुळे काही अंशी तरी बसस्थानकाच्या परिसरातील वाहतूक कमी होईल. तीन - एमआयडीसी येथे वर्कशॉप झाल्यावर अकलूूज, पंढरपूर, माढा, करमाळा आदी भागातील डेपोंना दुरुस्तीसाठी सोलापूरला यावे लागणार नाही. त्यामुळे त्यांची १२ किमी डिझेलची बचत होण्यास मदत होणार आहे.
अत्याधुनिक वर्कशाॅप
^सोलापूर बसस्थानकावरील वर्कशॉप एमआयडीसी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमआयडीसी चिंचोळी येथे नवे आणि अत्याधुनिक असे वर्कशॉप उभारले जाणार आहे. शिवाजी चौकातील स्थानकावर भविष्यात अतिरिक्त फलाट बांधले जाणार आहे. विजयदेशमुख, परिवहन राज्यमंत्री

बचतही होणार आहे
^वर्कशॉपचे स्थलांतर होणार असल्याने एसटी प्रशासनाची एका गाडीमागे १२ किमीची बचत होणार आहे. त्यामुळे डिझेल बचत मोठ्या प्रमाणात होण्यास मदत मिळणार आहे. पुढील महिन्यात भंगार अवस्थेतील गाड्यांचेही स्थलांतर केले जाणार आहे. श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...