आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन फोफावले, शेंगाचा पत्ताच नाही; तेर परिसरातील परिस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर - दुष्काळातून सावरणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाने घेरले आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने सोयाबीनचे पीक जोमात आले आहे. मात्र, तेर (ता.उस्मानाबाद) परिसरातील या पिकाला शेंगाचा पत्ताच नाही. शेंगाशिवाय वाढ होणाऱ्या या पिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 
 
तेरमध्ये १८६० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा संकटाला सामाेरे जावे लागण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. ५५ ते ६० दिवस ऐन शेंगा लागण्याच्या काळातच पावसाने प्रचंड ओढ दिल्यामुळे तसेच अालेल्या शेंगा उंदीर, किडीने खाऊन संपविल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. धास्तावलेले शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन मैनाबाई सलगर, हरी ढोणे, वसंत नाईकवाडी, अनंत काेळगे यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाणीपुरवठा सभावती भास्कर माळी, सोसायटी अध्यक्ष नवनाथ नाईकवाडी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बबलू मोमीन, विठ्ठल लामतुरे, सुनील लाड आदींनी पीकांची पाहणी करून शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली. 
 
बातम्या आणखी आहेत...