आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yellow Water, NTPC Issue Finally To Chief Minister

पिवळसर पाणी, एनटीपीसी विषय अखेर मुख्यमंत्र्यांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराला होत असलेला पिवळसर पाणीपुरवठा, एनटीपीसीची अपूर्ण जलवाहिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज मंगळवारी दुपारी ३.३० वाजता बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती, आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

सोलापूर शहराला होत असलेल्या पिवळसर पाण्यासंबंधी सोशल फोरमच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना निवेदन दिले. यावेळी फोरमचे सदस्य उद्योजक किशोर चंडक, यतीन शहा, डॉ. राजीव प्रधान, जितेंद्र राठी, केतन शहा, संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर आ. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठकीसाठी वेळ घेतली आहे, त्यानुसार वरील तिन्ही विषयांवर मंगळवारी बैठक होणार अाहे. या बैठकीस महापालिका पदाधिकारी अधिकारी, एनटीपीसीचे अधिकारी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार अाहेत.

सध्या जे पाणी दिले जात आहे, ते रासायनिक प्रक्रिया करून दिले जात आहे. हेच पाणी अधिक दिवस दिल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पिवळसर पाण्याऐवजी स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल येण्यास आठवडाभराचा कालावधी लागणार आहे, तो येताच पिवळसर पाणी कशामुळे होते, हे स्पष्ट होईल. मळीमिश्रित पाणी असेल तर संबंधित कारखान्यावर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहती आमदार शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दूषित पाणीपुरवठ्यास जबाबदार असलेल्या सर्व घटकांवर कारवाई करण्याबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. औज बंधाऱ्यात भीमा नदीपात्रात मिसळलेली रासायनिक द्रव्ये, टाकाऊ मळी अशा गंभीर प्रकारावर महामंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही. दूषित पाण्याचा सोलापूरकरांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत अाहे, यासंबंधी सोशल फोरम जनहित याचिका दाखल करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

लवकरच संयुक्त बैठक...
एनटीपीसीजलवाहिनी मार्चपर्यंत पूर्ण होणार नसल्याचे एनटीपीसीने स्पष्ट केले आहे. यामुळे शहराला आणखी दोन आवर्तने नदीपात्रातूनच घ्यावी लागणार आहेत. यासंबंधी खुद्द मुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन १५ जानेवारीपर्यंत जलवाहिनी पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एनटीपीसी महापालिका यांच्यातील करार काय आहे माहिती नाही ? यासंबंधी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांची लवकरच संयुक्त बैठक बोलाविणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.