आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिवळसर पाणीपुरवठा; कारखाने अन् बंधाऱ्यांची तपासणी सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहराच्या अनेक भागांमध्ये येणाऱ्या पिवळसर पाण्याच्या कारणांचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे घेण्यात येत असून भीमानदीवरील बंधारे साखर कारखान्यांची कसून तपासणी सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबई पुणे येथील विशेष पथकाने घेतलेल्या पाणी नमुन्यांचा अहवाल थेट शासनाकडे सादर होणार असल्याची माहिती, उपप्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके (पुणे) यांनी दिली.

श्री. डोके म्हणाले,पिवळसर पाण्याच्या कारणांचा शोध सुरू आहे. उजनी धरणानंतर भीमा नदीपात्रातील १४ बंधाऱ्यांपैकी सुरवातीला फक्त आैज बंधाऱ्यातील पाण्याचे नमुने घेतले होते. इतर बंधाऱ्यांतील पाण्याचे नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गेल्या आठवड्यात जकराया कारखान परिसराची पाहणी केली असून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. इतर साखर कारखाने त्यांमधील सांडपाणी सोडण्याच्या नियोजनाची पाहणी सुरू आहे. शनिवारी (दि.२) मुंबई येथील विशेष पथकाने पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्यामध्ये आयआयटी पवई येथील शास्त्रज्ञांचा समावेश होता. रविवारी पुणे येथील मध्यवर्ती प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतलेत. माशांचा मृत्यू कशामुळे झाला ? पाण्याला पिवळसर रंग येण्याच्या कारणांचा शोध सुरू आहे. दोन्ही पथके त्यांचा तपासणी अहवाल शासनाकडे देणार आहेत. शासनाकडून येणाऱ्या सूचनानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढील कार्यवाही करणार असल्याचे, डोके यांनी सांगितले.