आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरमाळा ग्रामपंचायतीला मिळाले आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येरमाळा- कळंबतालुक्यातील येरमाळा ग्रामपंचायतीला तालुक्यातील पहिला आयएसओ मानांकित ग्रामपंचायत होण्याचा बहुमान मिळाला आहे. सामान्य प्रशासन विभागात गावातील ग्रामस्थांना विविध सुविधा देताना कारभारात सुसूत्रता, पारदर्शकता ठेवत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन येरमाळा ग्रामपंचायतीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयएसओ मानांकन मिळाले आहे.

विविध क्षेत्रांतील सेवा विभागात कार्यरत संस्थांना अंतर्गत गुणवत्ता, सामान्य प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आयएसओ मानांकन दिले जाते. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन असून यासाठी येरमाळा ग्रामपंचायतीने लातूर येथील विमझीट कंपनीच्या मार्गदर्शनखाली काम करताना सामान्य प्रशासन सेवेत गावातील ग्रामस्थांना आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन,समाजकल्याण, कृषी, बांधकाम तसेच महिला बाल कल्याण अशा विविध विभागांतर्गत कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच याबाबतचा आयएसओ साठीचा प्रस्ताव सादर केला. याची दखल घेऊन येरमाळा ग्रामपंचायतला ९००१-२००८ असे आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतीची जबाबदारी आणखी वाढली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, सुशोभीकरण, कार्यालयात शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसविणे, संगणकीय विभाग, संग्राम कक्षाच्या माध्यमातून तत्काळ दस्ताऐवज उपलब्ध व्हावे यासाठी दस्ताऐवज वर्गीकरण, प्रशासनाच्या विविध सुविधा देणाऱ्या योजनांचे भित्तीपत्रक, विविध कक्षाचे फलक यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाचा कायापालट करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना गणेवश देण्यात आले आहेत. सदरील आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी सरपंच मुरहरी कांबळे, उपसरपंच दशरथ जाधव, यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी सवने, भाऊसाहेब बारकुल, रोजगार सेवक मदन बारकुल, संगणकज्ज्ञ भरत उगडे, ग्रामविकास अधिकारी उमेश बारकुल आदींनी विशेष पुढाकार घेतला.

ग्रामस्थांचे सहकार्य
आएसओमानांकनासाठी सर्वप्रथम सुसज्ज इमारत आवश्यक आहे. ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी यासाठी नोंदणी करून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केले. यासाठी लातूर येथील विमझीट कंपनीचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर ऑगस्ट रोजी आएसओ मानांकनाचा घोषणा करण्यात आली. १४ ऑगस्ट रोजी याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. यासाठी सर्व आजी, माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.'' उमेशबारकुल, ग्राम विकास अधिकारी येरमाळा ग्रामपंचायत